Wednesday, June 26, 2024
Homeताज्या घडामोडीमुंबईकरांना दसऱ्याचे '५जी' गिफ्ट

मुंबईकरांना दसऱ्याचे ‘५जी’ गिफ्ट

मुंबई : मुंबईत उद्यापासून रिलायन्स जिओची ‘५जी’ सेवा सुरु होणार आहे. या मोठ्या निर्णयाने जिओने मुंबईकरांना दसऱ्याचे गिफ्ट दिले आहे. त्यामुळे मुंबईकरांचा सर्वात आधी वेगवान इंटरनेटच्या युगात प्रवेश होणार आहे.

रिलायन्स जिओ दसऱ्याच्याच दिवशी मुंबईसह दिल्ली, कोलकाता आणि वाराणसी या मेट्रो शहरांमध्ये ‘५जी’ सेवेची बीटा ट्रायल सुरु करणार आहे. सध्या ही सेवा चाचणी तत्वावर राबवण्यात येणार असून त्यात काही त्रूटी आढळून आल्यास त्या दूर करुन चांगल्या प्रकारची सेवा देता येणार आहे.

सर्वच ‘५जी’ मोबाईल युजर ही सेवा वापरू शकणार नाहीत. कंपनीने यासाठी वेलकम ऑफर जारी केली आहे. यानुसार कंपनी तुम्हाला ‘५जी’ नेटवर्क वापरण्याची संधी देणार आहे. यासाठी तुम्ही कंपनीला फिडबॅक देऊ शकणार आहात.

जिओने ‘५जी’ सेवा इन्व्हाईट बेस्ड ठेवली आहे, म्हणजेच कंपनी ग्राहकांना ‘५जी’ सेवा वापरण्यासाठी निमंत्रित करणार आहे. ज्यांना हे निमंत्रण मिळेल तेच लोक जिओची ‘५जी’ सेवा वापरू शकणार आहेत. किती ग्राहकांना कंपनी निमंत्रीत करणार हे अद्याप स्पष्ट केलेले नाही.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -