Sunday, July 21, 2024
Homeमहत्वाची बातमीअर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी स्वदेशी वस्तूंचा वापर करा : भारती पवार

अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी स्वदेशी वस्तूंचा वापर करा : भारती पवार

भाजपचा‘राष्ट्र नेता ते राष्ट्रपिता’ सेवा पंधरवडा उपक्रम

कळवण (प्रतिनिधी) : देशाची अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी व स्थानिकाना रोजगार मिळण्यासाठी सर्वानी देशातील ग्रामीण भागात तयार होणाऱ्या वस्तूंचा म्हणजे स्वदेशी वस्तूंचा जास्तीत जास्त वापर करावा, असे आवाहन केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी केले.

‘राष्ट्र नेता ते राष्ट्रपिता’ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसापासून ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीपर्यंत भारतीय जनता पार्टीच्या वतीने ‘राष्ट्र नेता ते राष्ट्रपिता’ सेवा पंधरवडा हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत तालुक्यातील कनाशी येथे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत केंद्रीय मंत्री डॉ. भारती पवार यांच्या सूचनेनुसार आदिवासी महिला व पुरुष बचत गट समूहासाठी ‘आत्मनिर्भर’ स्वयंरोजगार प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेच्या व्हीडिओ कॉन्फरन्सद्वारे दिल्ली येथून ऑनलाईन उदघाटनप्रसंगी डॉ. पवार बोलत होत्या.

पुढे बोलतांना त्या म्हणाल्या की, आदिवासी महिला व पुरुषांच्या अंगी अनेक कलागुण आहेत. ते पारंपरिक पद्धतीने अनेक वस्तू बनवत असतात. त्यांना विज्ञानाची साथ मिळाली तर ते अधिक टिकावू वस्तू बनवू शकतील. त्यांना त्यापासून स्थानिक ठिकाणी चांगला रोजगार उपलब्ध होऊ शकतो. तसेच त्यांनी तयार केलेल्या वस्तू स्थानिक नागरिकांनी खरेदी कराव्यात, जेणेकरून देशातील पैसा देशातच राहील व देशाच्या अर्थव्यवस्थेला हातभार लागेल. परिणामी स्थानिक नागरिकांचे शहराकडचे स्थलांतर थांबेल त्यामुळे सर्व नागरिकांनी स्वदेशी वस्तू वापरावर भर देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाला महासत्ता बनविण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन केले.

यावेळी आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी प्रमोद पाटील, भाजपा तालुकाध्यक्ष दिपक खैरनार, माजी ग्रामीण जिल्हाध्यक्ष विकास देशमुख, व्यापारी आघाडीचे गोविंद कोठावदे, सरचिटणीस एस. के. पगार, वैद्यकीय आघाडीचे डॉ. अनिल महाजन, उपाध्यक्ष हेमंत पाटील, युवा मोर्चा अध्यक्ष हितेंद्र पगार, उपाध्यक्ष भूषण देसाई, कनाशी शहराध्यक्ष सोहम महाजन, शेखर जोशी, आदिवासी आघाडी अध्यक्ष लोकेश पवार, अंबादास देसाई, जिल्हा सदस्य राजेंद्र ठाकरे, गोपीनाथ जाधव, राकेश गोविंद, गोरख गांगुर्डे, मोहन चौधरी, पोपट जगताप, विवेक पाटील, व तालुक्यातील आदिवासी महिला व पुरुष बचत गटाचे सदस्य व सरपंच व विका सोसायटीचे पदाधिकारी नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक सुधाकर पगार यांनी केले. आभार सातपुते यांनी मानले.

या कार्यशाळेत बचत गटाच्या आदिवासी महिला व पुरूषांनी स्वतः तयार केलेल्या हस्तकला, वारली चित्रकला असलेल्या वस्तू, रानभाज्या, औषधी वनस्पती पासून तयार केलेली औषधे, बांबूपासून तयार केलेले आकाश कंदील व शोपीस वस्तू विक्रीसाठी ठेवल्या होत्या.

कार्यक्रमप्रसंगी प्रकल्पातील कनाशी शासकीय अश्रामशाळेतील विद्यार्थ्यांना प्रकल्प अधिकारी प्रमोद पाटील व सहाय्यक प्रकल्पाधिकारी दीपक कालेकर यांच्या हस्ते जातीच्या दाखल्यांचे वाटप करण्यात आले.

सेवा पंधरवाडा निमित्ताने कळवण तालुका भाजपाच्या वतीने रक्तदान शिबीर, आरोग्यतपासणी शिबीर, पंडित दीनदयाल जयंती, गरोदर माता तपासणी शिबीर, नेत्रतपासणी शिबीर अभोणा रुग्णालय, सप्तशृंगी गडावर स्वच्छता अभियान व वृक्षलागवड, सिकलसेल तपासणी शिबीर,आदिवासी महिला व पुरुष बचतगट याना स्वयंरोजगार प्रशिक्षण कार्यशाळा कनाशी आदी उपक्रम राबविण्यात आले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -