Wednesday, June 26, 2024
Homeताज्या घडामोडीकोसळलेल्या पुलाच्या हद्दीवरून रेल्वे, बांधकाम विभागात वाद, नागरिकांकडून नव्या पुलाची मागणी

कोसळलेल्या पुलाच्या हद्दीवरून रेल्वे, बांधकाम विभागात वाद, नागरिकांकडून नव्या पुलाची मागणी

केंद्रीय कुटुंब कल्याण आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी केली अधिकाऱ्यांची कान उघडणी

मनमाड : मनमाड शहरातील दोन भागांना जोडणारा रेल्वे ब्रिज २९ नोव्हेंबरच्या पहाटे पाचच्या सुमारास पुलाकडील भाग पडल्याने इंदोर पुणे महामार्ग पूर्णपणे बंद झाला असून वाहनधारकांचे व स्थानिक नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत असून सर्वपक्षीय नेत्यांकडून वेळोवेळी पत्रव्यवहार करूनही रेल्वे व बांधकाम विभागाने याकडे दुर्लक्ष केले.

आता या ब्रिजचे दुरुस्तीचे काम सुरू झाले पण स्थानिक नागरिकांनी याला विरोध करत पुलाची नव्याने निर्मिती करण्यात यावी असा एकच हट्ट धरला आहे.

आज या पुलाची पाहणी करण्याकरिता आलेल्या केंद्रीय कुटुंब कल्याण आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधत अधिकाऱ्यांना बे जबाबदार धरत धारेवर धरले. पुलाच्या दुरुस्तीबाबत कोणत्याही प्रकारची गय केली जाणार नाही. दोषी असलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई देखील केली जाईल, मी सर्व अधिकाऱ्यांना सूचना केल्या असून तसेच पुलाच्या नवीन निर्मिती बाबत केंद्रीय रस्ते व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्याशी आपण सविस्तर चर्चा करून लवकरात लवकर निधी उपलब्ध होईल, त्याचा पाठपुरावा करणार, जनतेला होणाऱ्या त्रासातून लवकरात लवकर मुक्त करणार, असे आश्वासन मंत्री भारती पवार यांनी दिले आहे.

यावेळी पुलाच्या पाहणी दरम्यान मोठ्या संख्येने रेल्वे अधिकारी व बांधकाम विभागाचे अधिकारी व पोलीस प्रशासनास तसेच स्थानिक पदाधिकारी भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व नेते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

“पुलाच्या कामाबाबत लवकरात लवकर केंद्रीय व रोड परिवहन मंत्री नितीनजी गडकरी यांच्याशी सविस्तर चर्चा करून निधीबाबत पाठपुरावा करणार व तात्पुरत्या स्वरूपात ब्रिजचे दुरुस्तीचे काम लवकरात लवकर पूर्ण करून नागरिकांना होत असलेल्या त्रासातून मुक्त करावे अशा सूचना अधिकाऱ्यांना देत अधिकाऱ्यांची कान उघडली केली असून कोणत्याही अधिकाऱ्यांची गाय केली जाणार नाही दोषी असलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल.” – डॉ. भारती पवार, केंद्रीय कुटुंब कल्याण राज्यमंत्री

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -