कबड्डी, बास्केटबॉल, हॅन्ड बॉलमध्ये सुवर्ण
नाशिक : जळगाव येथे ३४ वी नाशिक परीक्षेत्रीय पोलिस किडा स्पर्धा नुकतीच पार पडली असुन सदर स्पर्धे मध्ये नाशिक परिक्षेत्रातील जळगाव, धुळे, नंदुरबार, अहमदनगर, नाशिक ग्रामीण तसेच पोलिस आयुक्तालयाचे पुरूष व महिलांचे संघ सहभागी झाले होते. नाशिक आयुक्तालयाचे वतीने एकुण १४० पुरुष व ४० महिला खेळाडूंनी सहभाग नोंदविला होता. यामध्ये नाशिक आयुक्तालयाचे खेळाडू यांनी सांघिक व वैयक्तीय खेळात विविध मेडल मिळवून अव्वल स्थान प्राप्त केले.
सांघिक खेळात नाशिक शहर पोलिस दलातील पुरुष खेळाडु यांनी कबड्डी-सुवर्ण, बास्केटबॉल-सुवर्ण, हँडबॉल- सुवर्ण, हॉकी – रौप्य, हॉलीबॉल-रौप्य तर वैयक्तिक खेळात अंकुश पावरा – ४००, १८०० मिटर धावणे सुवर्ण पदक, गोरख जाधव- ११० मिटर हार्डल्स – रौप्य पदक, स्विमींग फि स्टाईल १०० मीटर, बॅकस्ट्रोक ५० मीटर, संतोष बुचडे- १५०० मिटर धावणे,सुवर्ण, स्टेपल घेस्ट – सुवर्ण, ज्ञानेश्वर कातकाडे- रिवमींग ब्रेस्ट स्टोक ५०/१०० मिटर- रौप्य, मधुकर पिंपळके- फ्री स्टाईल ५०मिटर- रोप्य, मिडले २०० मिटर रौप्य, विष्णु खाडे १०० मिटर बटर फ्लय- सुवर्ण, गणेश पिंगळे- १५०० मिटर फि स्टाईल-रौप्य, संदिप निकम- हायबोर्ड डायविंग रौप्य, ललीत सपकाळे ४०० मिटर रौप्य, नितीन चोरगे-बाळासाहेब भोर- उ मिटर प्लॅटफार्म डायविंग- सुवर्ण स्विमींग रिले ४/१०० मध्ये रौप्य पदक, फि स्टाईल ४०० मिटर रिले रौप्य, प्रविण कदम: त्यायकांदो – रौप्य, कुस्ती- रौप्य, भाला फेक रौप्य, गोळा फेक कांस्य, विकास गायकवाड गोळा फेक- कांस्य, रमेश गोसावी-बॉक्सिंग-कांस्य, तुलसीदास चौधरी थाळी फेक-रौप्य पदक, प्रशांत भोई बॉक्सींग रौप्य, प्रशांत लोंढे- तिहेरी उडी- गोल्ड, लांब उडी-रौप्य, कुस्ती- रौप्य, वेटलिफ्टींग या किडा प्रकारात संदिप निकम, मयुर पवार, पारस देशमुख गोल्ड तर अश्विन कुमावत, सुरेश बोडके, प्रविण कदम- रौप्य, ४/१०० रिले-हौप्य, ४/४०० रिले-रौप्य, कॉसकन्ट्री गोल्ड, गणेश कोडे, राकेश शिंदे व पवन पगारे यांना बॉक्सिंग या खेळात रौप्य पदक असे पदक प्राप्त केले.
तसेच महिला खेळाडु यांनी सांधिक खेळात व्हॉलीबॉल या खेळात सुवर्ण पदक, बास्केट बॉल खेळात रौप्य पदक, कबडडी खेळात कांस्य पदक तर वैयक्तीक खेळात अॅथलॅटीक्स या खेळात मंजु सहाणी, रत्नमाला घरटे, साधना गडाख, यांनी रौप्य पदक पटकावले तर वेटलिफटींग या खेळात भाग्यश्री कापडणीस, मंजु सहाणी, प्रियंका झाल्टे, राजश्री शिंदे, सोनाली काटे, अश्विनी भोसले, अश्विनी गिरी, मिनाक्षी तोंडे, यांनी यांनी सुवर्ण पदक तर किशोरी देशपांडे, साधना गडाख यांनी रौप्य पदक व अर्चना थोरात यांनी कांस्य पदक प्राप्त केले.
कुस्ती या खेळात भाग्यश्री कापडणीस, राजश्री शिंदे, मिनाक्षी तोंडे यांना सुवर्ण पदक तर सुनिता साबळे, मंजु सहाणी, सिमा जयस्वाल, प्रगती जाधव यांना रौप्य पदक तर प्रियंका झाल्टे यांनी कांस्य पदक प्राप्त केले. ज्युदो याखेळात मिनाश्री तोंडे, सुनिता साबळे यांनी सुवर्ण पदक तर शितल लोखंडे, दिव्या देसले यांनी कांस्य पदक मिळविले.
बॉक्सिंग या खेळात शितल लोखंडे, किशोरी देशपांडे, मिना श्री देशपांडे, यांनी सुवर्ण पदक मिळविले असुन सिमा जैसवार, अश्विनी भोसले, माधुरी खुळे यांनी रौप्य पदक मिळणे आहे. एकुण पुरुष खेळाडूंनी सांघिक खेळात ३ सुवर्ण, २ रोप्य व वैयक्तिक खेळात १२ सुवर्ण, ३४ रौप्य, ११ कांस्य तर महिला खेळाडु यांनी सांधिक खेळात १ सुवर्ण, १ रौप्य,१ कांस्य तर वैयक्तिक खेळात १५ सुवर्ण १७, रौप्य, ८ कांस्य असे पदक मिळवुन कुस्ती, वेटलिफटींग, या खेळात चॅम्पीयनशिप मिळविली.
सदर खेळाडूंना सपोउनि अशपाक शेख, क्रीडा प्रमुख तसेच पोहवा राजेश सोळसे, सहाय्यक क्रीडा प्रमुख यांनी सर्व खेळाडूंना प्रशिक्षण देउन मार्गदर्शन केले.
विजयी सर्व खेळाडुंचे पोलिस आयुक्त संदिप कर्णिक, उपायुक्त चंद्रकांत खांडवी, उपायुक्त मोनिका राउत, उपआयुक्त, किरणकुमार चव्हाण, उपायुक्त गुन्हे प्रशांत बच्छाव, सहा. पो. आयुक्त सिताराम कोल्हे, राखीव पो. नि. सोपान देवरे यांनी अभिनंदन केले. तसेच सर्व विजयी खेळाडु यांनी आगामी किडा स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.