Wednesday, June 26, 2024
Homeताज्या घडामोडीAir India : हवाई क्षेत्रात जायचंय? एअर इंडिया देतंय 'ही' नामी संधी

Air India : हवाई क्षेत्रात जायचंय? एअर इंडिया देतंय ‘ही’ नामी संधी

दरवर्षी १८० वैमानिकांना मिळणार प्रशिक्षण

नवी दिल्ली : हवाई वाहतूक दलासाठी इच्छुक करिअर करणाऱ्या युवकांसाठी आनंदाची बातमी मिळत आहे. विमान वाहतूक उद्योगात करिअर करणाऱ्या तरुणांना उत्कृष्ट संधी मिळवून देण्याच्या प्रयत्नात एअर इंडियाने (Air India) स्वतःचे ‘फ्लाइंग स्कूल’ स्थापन करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. जागतिक स्तरावर प्रशिक्षित वैमानिकांची वाढती मागणी आणि भारतातील वाढत्या विमान वाहतूक क्षेत्राच्या पार्श्वभूमीवर एअर इंडियाकडून हे पाऊल उचलण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, फ्लाइंग स्कूल उपक्रम हा एअर इंडियाच्या देशांतर्गत प्रशिक्षण सुविधा वाढविण्याच्या आणि कुशल वैमानिकांच्या विकासासाठी योगदान देण्याच्या व्यापक धोरणाचा एक भाग आहे. यामध्ये विद्यार्थ्यांना विविध वैमानिक प्रशिक्षण दिले जाणार आहे. यात प्रारंभिक, उच्च आणि व्यावसायिक वैमानिक प्रशिक्षण प्रोग्रामचा समावेश असणार आहे. तसेच, एअर इंडियाच्या फ्लाइंग स्कूलमध्ये प्रशिक्षणासाठी अत्याधुनिक आणि प्रगत विमान वाहतूक उपकरणे वापरली जाणार आहेत. ज्यामध्ये उच्च दर्जाचे फ्लाइंग सिम्युलेटर आणि इतर विमानसेवेशी संबंधित उपकरणांचा समावेश असणार आहे.

दरवर्षी १८० वैमानिकांना प्रशिक्षण

वैमानिकांच्या कमतरतेचा सामना करण्यासाठी, एअर इंडियाने महाराष्ट्रातील अमरावती येथे एक स्कूल उघडण्याची योजना आखली आहे. या योजनेअंतर्गत दरवर्षी १८० वैमानिकांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या स्कूलमध्ये कोणतेही पूर्व उड्डाण अनुभव नसलेले संभाव्य वैमानिक पूर्णवेळ अकादमीमध्ये प्रवेश घेऊ शकतात, ज्यामुळे त्यांना प्रशिक्षणाचे पुढील टप्पे पूर्ण केल्यानंतर एअर इंडियाच्या कॉकपिटमध्ये सामील होण्याचा मार्ग मोकळा असेल.

प्रवेशासाठी कठोर निवड प्रक्रिया

विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे प्रशिक्षण आणि मार्गदर्शन मिळावे यासाठी एअर इंडिया अनुभवी आणि प्रमाणित वैमानिकांना प्रशिक्षक म्हणून नियुक्त करण्याची योजना आखत आहे. फ्लाइंग स्कूलमध्ये प्रवेशासाठी निवड प्रक्रिया कठोर असणार आहे. उमेदवारांची शैक्षणिक पात्रता, शारीरिक तंदुरुस्ती आणि वैयक्तिक मुलाखत यांच्या आधारे त्यांचे मूल्यांकन केले जाणार आहे.

दरम्यान, विमान वाहतूक उद्योगातील कुशल वैमानिकांची वाढती मागणी पूर्ण करणे आणि भारतातील या क्षेत्राच्या एकूण वाढीस हातभार लावणे हा कंपनीच्या या उपक्रमाचा उद्देश आहे. तर नजीकच्या काळात फ्लाइंग स्कूलचे कामकाज सुरू होण्याची अपेक्षा असल्याचे एअर इंडियाने सांगितले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -