Thursday, July 25, 2024
Homeताज्या घडामोडीमहाराष्ट्रात चार हजार लोकांना मिळणार रोजगार; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

महाराष्ट्रात चार हजार लोकांना मिळणार रोजगार; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

मुंबई : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ईव्ही क्षेत्रातील बडी स्टार्टअप कंपनी २००० कोटींची गुंतवणूक करणार आहे. ईव्ही दुचाकी निर्माण करणारी एथर ही कंपनी छत्रपती संभाजीनगरमध्ये उत्पादन प्रकल्प उभारणार असून याद्वारे सुमारे ४००० रोजगार निर्माण होतील, अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

एथर एनर्जी कंपनी लवकरच ऑरिक सिटीच्या बिडकीन एमआयडीसीमध्ये १०० एकरावर आपला प्रकल्प उभारणार आहे. महाराष्ट्रातील पहिला प्रकल्प डीएमआयसीमध्ये उभारण्यासाठी दोन वर्षांपूर्वी चाचपणी करण्यास सुरुवात केली होती. अधिकाऱ्यांनी जागेचीही पाहणी केली होती. एवढेच नव्हे तर येथील सीएमआयएच्या पदाधिकाऱ्यांसोबतही चर्चा केली होती. सरकारकडून कंपनीला आवश्यक ते आश्वासन मिळाल्यानंतर कंपनीच्या संचालक मंडळाने बिडकीन डीएमएआयसीमध्ये आपला प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला. एथरचा हा तिसरा उत्पादन प्रकल्प आहे. या कंपनीला हिरो मोटो कॉर्पचे आर्थि पाठबळ आहे.

एथरचा अत्याधुनिक प्लांट दरवर्षी १ दशलक्ष युनिटपर्यंत वाहने आणि बॅटरी पॅक दोन्ही तयार करणार आहे. समृद्धी द्रुतगती मार्गाद्वारे प्रभावी कनेक्टिव्हिटीमुळे, गुंतवणूकदार या मराठवाड्याची क्षमता वाढवत आहेत. एथरने मराठवाड्याची केलेली निवड महाराष्ट्राच्या विकासकथेचे नेतृत्व करेल, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -