Friday, March 28, 2025
Homeताज्या घडामोडीपॅलेस्टाईनच्या घोषणा देणाऱ्या ओवैसींवर आमदार नितेश राणे यांचा हल्लाबोल

पॅलेस्टाईनच्या घोषणा देणाऱ्या ओवैसींवर आमदार नितेश राणे यांचा हल्लाबोल

कणकवली : ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (एआयएमआयए) चे नेते असदुद्दीन ओवैसी यांनी लोकसभा सदस्य म्हणून शपथ घेताना पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ घोषणा दिली. या घोषणाचे पडसाद देशभर उमटले असून, भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते आणि कणकवली विधानसभेचे आमदार नितेश राणे यांनी ओवैसी यांच्यावर कडाडून हल्लाबोल केला आहे.

भारतीय आणि हिंदू राष्ट्राची ताकद काय आहे हे आम्ही दाखवून देऊ, असे आवाहन आमदार नितेश राणे यांनी केले आहे.

ओवैसी यांनी खासदारकीची शपथ घेताना पॅलेस्टाईनचा जयजयकार केला. पाकिस्तानच्या संसदेत जर कोणी जय श्रीरामचा नारा दिला असता. वंदे मातरमचा नारा दिला असता तर ती व्यक्ती जिवंतपणे संसदेबाहेर येऊ शकली नसती. आमच्या संसदेत लोकशाहीची पूजा होते. भारत हा लोकशाही प्रधान देश आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाने आम्ही चालतो, असेही ते यावेळी म्हणाले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -