Wednesday, June 26, 2024
Homeताज्या घडामोडीPune Vidhansabha : पुण्याच्या जागांवरुन मविआ आघाडीत होणार बिघाडी!

Pune Vidhansabha : पुण्याच्या जागांवरुन मविआ आघाडीत होणार बिघाडी!

ठाकरे-पवारांमध्ये नवा वाद रंगण्याची शक्यता

पुणे : लोकसभा निवडणुकीत (Loksabha Election) महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) ३० जागा जिंकत महाराष्ट्रात चांगली कामगिरी केली. परंतु हीच आघाडी विधानसभेतही (Vidhansabha Election) एकनिष्ठ राहणार का, असा सवाल मविआची सद्यपरिस्थिती पाहता उपस्थित होत आहे. मविआच्या नेत्यांनी ही निवडणूक एकत्रच लढवणार असल्याचे सांगितले असले तरी अंतर्गत वाद मात्र चव्हाट्यावर आल्यावाचून राहत नाहीत. त्यातच आता पुण्याच्या जागांवरुन (Pune vidhansabha) ठाकरे गटात (Thackeray Group) व राष्ट्रवादी शरद पवार गटात (NCP Sharad Pawar group) नवा वाद रंगण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कारण दोन्ही पक्षांकडून पुण्याच्या मतदारसंघांवर दावा ठोकण्यात आला आहे.

पुणे शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या पुणे शहर कार्यकारिणीची बैठक संपन्न झाली व या बैठकीनंतर पुणे शहरातील ८ पैकी ६ विधानसभा मतदारसंघात शरदचंद्र पवार पक्षाचा उमेदवार हवा असा अहवाल वरिष्ठांना पाठवण्यात आला. पुण्यातील आठही मतदारसंघांचा आढावा घेतल्यानंतर हडपसर, वडगाव शेरी, खडकवासला, शिवाजीनगर, पर्वती, पुणे कँटोन्मेंट या सहा मतदारसंघांत शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार मोठ्या फरकाने निवडून येणार हा विश्वास सर्वानुमते व्यक्त करण्यात आला.

तर दुसरीकडे उद्धव ठाकरे गटानेही पुण्यातील सहा मतदारसंघावर दावा केला आहे. कोथरूड, पर्वती, वडगाव शेरी, हडपसर, पुणे कॅन्टोन्मेंट आणि कसबा या मतदारसंघावर ठाकरे गटाकडून दावा करण्यात आला आहे. यांतील चार जागांवर दोन्ही गटाने दावा ठोकला असून त्यामुळे दोघांमध्ये वाद रंगण्याची शक्यता आहे. विधानसभेच्या जागावाटपावेळी पुण्यातील या मतदारसंघावरुन तिढा निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जागावाटप लांबू शकते. येत्या काळात मविआत कोण सांमजस्याची भूमिका घेणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -