Thursday, July 10, 2025

West Bengal Accident : पश्चिम बंगालमध्ये मालगाडी आणि एक्स्प्रेस रेल्वेची भीषण धडक!

West Bengal Accident : पश्चिम बंगालमध्ये मालगाडी आणि एक्स्प्रेस रेल्वेची भीषण धडक!

आतापर्यंत ४ जणांचा मृत्यू; मृतांचा आकडा वाढण्याची भीती


कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये रेल्वे अपघाताची (West Bengal train accident) एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. कंचनजंगा एक्सप्रेस (Kanchenjunga Express) आणि मालगाडीची जोरदार धडक झाली. ही धडक इतकी भीषण होती, की एक्स्प्रेस गाडी रुळावरून घसरली. यामुळे रेल्वेच्या मागील बाजूच्या तीन बोगींचे मोठे नुकसान झाले आहे. या अपघातात आतापर्यंत ४ प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. रंगपनीर स्टेशनजवळ हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. घटनास्थळी बचावकार्य सुरू आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, सियालवाहकडे जाताना कंचनजंगा एक्स्प्रेसचा भीषण अपघात झाला. या अपघातात आतापर्यंत चार जणांचा मृत्यू झाला असून, अनेक प्रवासी जखमी आहेत. त्यांना जवळच्या रुग्णालयात हलवण्यात येत आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे. बचाव पथक, वैद्यकीय मदतीसाठी डॉक्टरांची टीम, रुग्णवाहिका, पोलीस आणि आपत्ती पथके घटनास्थळी रवाना झाली आहेत. दरम्यान, या अपघाताची माहिती मिळताच, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी शोक व्यक्त केला आहे.



नेमकं काय घडलं?


पश्चिम बंगालच्या दार्जिलिंग जिल्ह्यात सोमवारी सकाळी कंचनजंगा एक्स्प्रेस सियालवाहकडे जात होती. त्यावेळी पॅसेंजर रेल्वे आणि कंचनजंगा एक्स्प्रेस यांची भीषण धडक झाली. ही धडक इतकी भीषण होती की कंचनजंगा एक्स्प्रेसचे अनेक डब्बे ट्रॅकवरुन खाली घसरले. आज सकाळी साडेनऊच्या सुमारास ही दुर्घटना घडली.

Comments
Add Comment