Wednesday, June 26, 2024
Homeताज्या घडामोडीWest Bengal railway Accident : पश्चिम बंगाल रेल्वे दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढला!

West Bengal railway Accident : पश्चिम बंगाल रेल्वे दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढला!

१५ जणांचा मृत्यू तर ६० जण जखमी

कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये आज सकाळच्या सुमारास रेल्वे अपघाताची (West Bengal train accident) एक धक्कादायक घटना घडली. कंचनजंगा एक्सप्रेस (Kanchenjunga Express) आणि मालगाडीची जोरदार धडक झाली. ही धडक इतकी भीषण होती, की एक्स्प्रेस गाडी रुळावरून घसरली. यामुळे रेल्वेच्या मागील बाजूच्या तीन बोगींचे मोठे नुकसान झाले आहे. या दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढला आहे. आतापर्यंत १५ जणांचा मृत्यू झाला असून ६० जण जखमी असल्याची माहिती आहे. या घटनेमुळे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मालगाडी अगरतलावरून सियालदाहकडे जाताना भीषण अपघात झाला. या मालगाडीने न्यू जलपाईगुडी येथे रुळावर उभ्या असलेल्या कंचनजंगा एक्सप्रेसला जोरदार धडक दिली. यामुळे एक्सप्रेसलाचे काही डबे थेट रुळावरून खाली घसरले. या अपघातात सकाळपर्यंत ४ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती होती.मात्र, हा आकडा वाढला असून आतापर्यंत १५ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ६० जण जखमी झाल्याची अतिरिक्त पोलिस अधिक्षक अभिषेक रॉय यांनी दिली आहे. या ठिकाणी रेक्यू टीमचे युद्धपातळीवर बचावकार्य सुरू आहे.

रेल्वेमंत्र्यांनीही दिली प्रतिक्रिया

दरम्यान, या अपघातानंतर रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सोशल मीडिया साईटवर पोस्ट करत यासंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे. न्यू जलपाईगुडी येथे झालेला अपघात दुर्दैवी असल्याचे रेल्वेमंत्री म्हणाले. तसेच घटनास्थळी एनडीआरएफ आणि एसडीआरएफची टीम दाखल झाली असून बचावकार्य सुरू आहे, अशी माहितीही त्यांनी दिली. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून वरिष्ठ अधिकारीही या ठिकाणी पोहोचले आहेत, असंही त्यांनी सांगितले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -