Friday, May 10, 2024
Homeक्रीडाSachin Tendulkar on Father's Day: बाबा…तुमची आठवण येते...

Sachin Tendulkar on Father’s Day: बाबा…तुमची आठवण येते…

‘फादर्स डे’च्या दिवशी सचिन तेंडुलकर झाला भावुक

मुंबई (प्रतिनिधी) : जगभरात १८ जून हा ‘फादर्स डे’ म्हणून साजरा केला जातो. हा दिवस वडिलांना समर्पित आहे. क्रिकेटचा देव म्हटल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरला या फादर्स डेच्यानिमित्ताने त्याचे वडील रमेश तेंडुलकर यांची आठवण झाली. सचिनचे वडील साहित्यिक आणि शिक्षक होते. फादर्स डेनिमित्त सचिन तेंडुलकरने एक खास ट्विट केले आहे. वडिलांसोबतचा फोटो शेअर करत सचिनने लिहिले की, ‘माझे वडील प्रेमळ होते, कडक नव्हते. घाबरण्याऐवजी ते नेहमी प्रेमाने वागले. त्यांनी मला खूप काही शिकवले. त्यांची विचारसरणी, मूल्ये आणि पालकत्वाच्या त्यांच्या कल्पना काळाच्या खूप पुढे होत्या. बाबा, मला तुमची आठवण येते’.

एका टीव्ही चॅनलवर बोलताना सचिन तेंडुलकर म्हणाला होता, ‘जेव्हा मी भारताकडून खेळायला सुरुवात केली, तेव्हा मी शाळेतून नुकताच बाहेर पडलो होतो. मला अनेक जाहिरातींच्या ऑफर मिळू लागल्या, पण माझ्या वडिलांनी मला तंबाखूजन्य पदार्थांची जाहिरात न करण्यास सांगितले होते. मला अनेक ऑफर आल्या पण मी त्यापैकी एकही स्वीकारली नाही’.

सचिन पुढे म्हणाला, ‘मी माझ्या वडिलांना वचन दिले होते. मी कधीही तंबाखूजन्य पदार्थ किंवा दारूचे समर्थन केले नाही. १९९० च्या दशकात माझ्या बॅटवर स्टिकर नव्हते, माझ्याकडे करार नव्हता. पण संघातील इतर सर्वजण खास ब्रँडचे समर्थन करत होते’.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -