Monday, May 20, 2024
Homeक्रीडाWorld Cup 2023: वर्ल्डकपच्या तयारीसाठी टीम इंडियाला खेळायला मिळणार १२ सामने

World Cup 2023: वर्ल्डकपच्या तयारीसाठी टीम इंडियाला खेळायला मिळणार १२ सामने

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत या वर्षी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेचे यजमानपद भूषवत असून, ४६ दिवस चालणाऱ्या या विश्वचषकात ४८ सामने खेळवले जाणार आहेत. त्यात बाद फेरीचे तीन सामनेही खेळवले जाणार आहेत. तसेच एकूण १० संघ यावेळी सहभागी होणार आहेत. एवढ्या मोठ्या स्पर्धेच्या तयारीसाठी टीम इंडियाला वर्ल्ड कपपूर्वी किमान १२ वनडे सामने खेळायला मिळू शकतात.

सर्व प्रथम, १२ जुलैपासून सुरू होणाऱ्या वेस्ट इंडिज दौऱ्यात टीम इंडिया २ कसोटी, ३ एकदिवसीय आणि ५ टी-२० सामने खेळणार आहे. ज्यामध्ये टीम इंडिया विश्वचषक मोहिमेची तयारी करताना दिसणार आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपनंतर भारतीय संघाने एक महिन्याचा ब्रेक घेतला आहे. आशिया चषक ३१ ऑगस्ट पासून सुरु होणार असून ही स्पर्धा यंदा एकदिवसीय फॉर्मेटमध्ये होणार आहे. ज्यामध्ये एकूण १३ सामने खेळले जातील. त्यापैकी टीम इंडिया जर अंतिम फेरीत पोहोचली तर ६ सामने खेळू शकते.

आशिया चषक २०२३ स्पर्धेचे स्वरूप –

या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सहाही संघांची दोन गटात विभागणी करण्यात आली आहे. प्रत्येक गटातून दोन संघ सुपर फोर फेरीत प्रवेश करतील आणि सुपर फोर फेरीतील अव्वल दोन संघांमध्ये अंतिम सामना खेळवला जाईल. या स्पर्धेत होणाऱ्या १३ सामन्यांपैकी चार सामने पाकिस्तानमध्ये आणि उर्वरित नऊ सामने श्रीलंकेत खेळवले जातील. आशिया चषक ३१ ऑगस्ट ते १७ सप्टेंबर दरम्यान होणार आहे. सविस्तर वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येईल.

आशिया चषकाचे सामने १५ वर्षांनंतर पाकिस्तानात होणार आहेत. पाकिस्तानने २००८ मध्ये शेवटच्या आशिया कपचे यजमानपद भूषवले होते. तेव्हा श्रीलंका अंतिम फेरीत भारताचा पराभव करून चॅम्पियन बनला होता. त्या अंतिम सामन्यात प्रथम फलंदाजी करताना सनथ जयसूर्याच्या १२५ धावांच्या शतकी खेळीच्या जोरावर श्रीलंकेने ४९.५ षटकांत २७३ धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल भारतीय संघ ३९.३ षटकांत १७३ धावांत सर्वबाद झाला आणि १०० धावांनी पराभूत झाला. या सामन्यात श्रीलंकेकडून अंजथा मेंडिसने ६ विकेट घेतल्या. पुढे वनडे विश्वचषक असल्याने यंदाचा आशिया कप वनडे फॉरमॅटमध्ये खेळवला जाणार आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -