Monday, May 20, 2024
Homeताज्या घडामोडीपुण्यासह, मराठवाड्यात अवकाळी पावसाच्या सरी

पुण्यासह, मराठवाड्यात अवकाळी पावसाच्या सरी

वाशिममध्ये वीज कोसळून एक ठार

नाशिक : राज्यातील कोकण वगळता इतर विभागातील बहुतांश जिल्ह्यात अवकाळी पावसाचे गुरूवारी आगमन झाल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला. पुणे, संभाजीनगर, हिंगोली, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली. यावेळी सोसाट्याचा वाराही वाहताना पाहायला मिळाला. हवामान खात्याचा अंदाज खरा ठरला असून अनेक भागांत पावसाचे आगमन झाले आहे. पुण्यातील सिंहगड रोडवरही जोरदार पाउस कोसळला. नांदेड सिटी, धायरी, बावधन, कात्रजघाट हायवे मार्गावर पाऊस झाला.

हवामान खात्याच्या अंदाजानुसार कालपासूनच यवतमाळ जिल्ह्यात ढगाळ वातावरण होते. तर दुपारच्या सुमारास यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी,दारव्हा, दिग्रस, पुसद, महागाव, नेर या तालुक्यांमध्ये वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटसह अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. जिल्ह्याचे तापमान हे ४२.५अंशांवर गेले असता अवकाळी पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला. या पावसामुळे उकाड्यापासून नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला. सध्या खरीप हंगामातील मशागतीच्या कामाला लागला असल्याने या पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. मात्र,अवकाळी पावसामुळे पालेभाज्या आणि फळबागांचे नुकसानही होत आहे.

चंद्रपूर शहर आणि जिल्ह्यातही आज मुसळधार पावसाने हजेरी लावली. सलग दोन दिवस चंद्रपुरात मुसळधार पाऊस अनुभवला जात आहे. गेला महिनाभर चंद्रपूरकर लाही-लाही करणारे ऊन अनुभवत होते. त्यावेळी, पारा ४४.२ डिग्री सेल्सिअसपर्यंत पोहोचला असताना गेले दोन दिवस सलग पडणाऱ्या पावसाने चंद्रपूरकरांना काहीसा दिलासा मिळाला. आजच्या पावसामुळे चंद्रपूर शहरातील बिनबा गेट ते आंबेडकर पुतळा मार्गावर पाणी देखील जमा झाले होते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -