Thursday, May 9, 2024
Homeसाप्ताहिकरिलॅक्समराठी चित्रपट आता प्रादेशिक राहिला नाही

मराठी चित्रपट आता प्रादेशिक राहिला नाही

टर्निंग पॉइंट – युवराज अवसरमल

सुरेश देशमानेनी आपल्या कामातून आपली ओळख निर्माण केलेली आहे. सिनेमाटोग्राफर म्हणून त्यांची ओळख जगविख्यात आहे, परंतु बदलत्या काळाची पावले ओळखून, त्याप्रमाणे पावले टाकणारा सिनेमाटोग्राफर अशी त्यांची ओळख आहे. गेल्या ३३ वर्षांपासून फिल्म इंडस्ट्री व जाहिरात क्षेत्रात ते काम करीत आहेत. त्यांनी प्रथम १६ एमएम चित्रपट, प्रथम ४ के स्टीरी ओस्कोपीक ३-डी चित्रपट, प्रथम आयमोक्स ५-के चित्रपट केले. महाराष्ट्र राज्य शासनाचा त्यांना चार वेळा पुरस्कार मिळाला. ब्रूकलिन फिल्म फेस्टीवल (अमेरिका), मास्को इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल, पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल यामध्ये त्यांना गौरवण्यात आले. सर्वोत्कृष्ट सिनेमाटोग्राफरसाठी व्ही.शांताराम अवॉर्ड, इंटरनॅशनल कोडक गोल्डन मेडल, झी टॉकीज अवॉर्ड, फुजी फिल्म गोल्ड अवॉर्ड त्यांना प्राप्त झालेले आहेत.

कारकिर्दीच्या सुरुवातीला त्यांनी ‘सिनेमास्कोप’ चित्रपट केला. तो त्यांच्या जीवनातला टर्निंग पॉइंट ठरला. बापू बिरू वाटेगावकर या चित्रपटासाठी त्यांना कोडाक गोल्ड मेडल मिळालं. फुजी फिल्म गोल्ड अवॉर्ड मिळाल. महेश कोठारेंसोबत ‘धडाकेबाज-२’ हा ४-के स्टीरीओफोनिक चित्रपट केला. आजचा मराठी चित्रपट हा लोकल राहिला नाही, तर तो ग्लोबल झालेला आहे. ओटीपी प्लॅटफॉर्मवर मराठी चित्रपट जर प्रदर्शित केला, तर तो जगभरात पाहिला जाईल. मकरंद अनासपुरेनीं ‘काळोखाच्या पारंब्या’ हा चित्रपट ब्रूकलिन फिल्म फेस्टिव्हलला पाठविला होता. सुरेश देशमाने त्या चित्रपटाचे सिनेमाटोग्राफर होते. तेथे त्यांना सर्वोत्कृष्ट सिनेमाटोग्राफरचा पुरस्कार मिळाला. ब्रूकलिनच्या लायब्ररीत हा अभ्यासासाठी ठेवलेला आहे. जगभरातील अभ्यासासाठी ठेवलेल्या चित्रपटांमध्ये या चित्रपटाचा चौथा क्रमांक लागतो. आपल्या देशाचा हा चित्रपट तेथे ठेवलेला आहे, ही आपल्या सर्वांसाठी अभिमानास्पद बाब आहे.

सिनेमाटोग्राफर हा दिग्दर्शक व प्रेक्षक यांच्यामधील दुवा आहे. दिग्दर्शकाची कल्पना, त्याचे कथानक प्रभावीपणे तो प्रेक्षकांसमोर मांडतो. त्याला येणाऱ्या नवीन लाईट्स, तंत्रज्ञान याचे ज्ञान असणे आवश्यक असते. ‘तेरव’ नावाचा चित्रपट नुकताच त्यांनी केला. त्यामध्ये आधुनिक तंत्रज्ञान असलेला कॅमेरा त्यांनी वापरला आहे. प्रेक्षकांच्या डोळ्यांना स्पष्टपणे दिसेल, असे वास्तववादी चित्रीकरण यामध्ये आहे. शेतकऱ्याच्या आत्महत्येनंतर जगणाऱ्या स्त्रीची कथा यामध्ये पाहायला मिळेल. कांचन अधिकारी दिग्दर्शित ‘जन्म ऋण’ या चित्रपटाचे ते सिनेमाटोग्राफर होते. त्या चित्रपटाच्या दिग्दर्शिका कांचन अधिकारी सोबत काम करण्याचा अनुभव कसा होता, असे विचारले असता ते म्हणाले की, कांचन ताईंना, फिल्म कशी करायची, कशी दाखवायची हे माहीत आहे. या चित्रपटासाठी तंत्रज्ञानात त्या कुठेही कमी पडल्या नाहीत. माझं आणि त्यांचं ट्यूनिंग फार चांगल होतं. त्यांच्या सोबत मी अगोदर देखील काम केलेलं आहे.

एखादी कलाकृती परिपूर्ण करण्याचा त्या प्रामाणिक प्रयत्न करीत असतात. दापोलीसारख्या नयनरम्य ठिकाणी या चित्रपटाचे शूटिंग करण्यात आले. त्यांच्या सारखे निर्माते जे सातत्याने चित्रपटनिर्मिती करीत असतात.

मराठी चित्रपटसृष्टीला योगदान देत असतात. प्रेक्षकांनी चित्रपट थिएटरमध्ये जाऊन पाहिले पाहिजेत. मकरंद अनासपुरे दिग्दर्शित ‘राजकारण गेलं मिशीत’ हा त्यांचा आगामी चित्रपट आहे.‘कली आख्यान’हा देखील चित्रपट येणार आहे. काळासोबत कॅमेरा तंत्रज्ञान अवगत करून, सर्वोत्कृष्ट छायाचित्रण करणाऱ्या सुरेश देशमाने यांना भावी आयुष्यासाठी हार्दिक शुभेच्छा!

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -