Monday, May 20, 2024
Homeताज्या घडामोडीविधान परिषदेच्या चार जागांसाठी १० जुनला मतदान

विधान परिषदेच्या चार जागांसाठी १० जुनला मतदान

पदवीधर, शिक्षक मतदारसंघाची निवडणूक जाहीर

मुंबई : राज्यात लोकसभेची रणधुमाळी संपते न संपते तोच विधानपरिषदेच्या चार जागांवर निवडणूक होत आहे. पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. मुंबई, नाशिक आणि कोकण विभागासाठी १० जूनला मतदान होत आहे. मुंबई आणि कोकण पदवीधर तसेच मुंबई, नाशिक शिक्षक मतदारसंघाची निवडणूक जाहीर झाली आहे. चार आमदारांचा कार्यकाळ ७ जुलैला संपत आहे.

विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील चार जागांसाठी १० जूनला मतदान होणार आहे. विधान परिषद सदस्यांच्या एकूण सदस्यांपैकी ७ सदस्य शिक्षक, तर ७ सदस्य पदवीधर मतदार संघातून निवडून जातात. दरम्यान दोन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदार संघातील रिक्त होणाऱ्या एकूण चार जागांसाठी निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला.

या कार्यक्रमानुसार १० जूनला मतदान होणार असून १३ जूनला मतमोजणी होईल. पदवीधर मतदार संघातील उमदेवाराला नोंदणी आवश्यक असते. मतदार संघात हजर राहून मतदान करावे लागते. निवडणूक जाहीर होण्याच्या तीन वर्षाआधी मतदाराने आपला पदवी अभ्यासक्रम पुर्ण केलेला असावा.

कशी असणार निवडणूक प्रक्रिया?

निवडणुकीची प्रक्रिया १५ मे पासून सुरू होणार आहे. इच्छुक उमेदवारांनी २२ मे पर्यंत अर्ज दाखल करता येणार आहे. इच्छुकांनी दाखल केलेल्या अर्जाची छाननी २४ मे रोजी होणार तर आहे. अर्ज मागे घ्यायचा असेल २७ मे पर्यंत उमेदवारांना अर्ज मगे घेता येणार आहे.

कोणत्या चार आमदारांचा कार्यकाळ ७ जुलैला संपणार?

विलास विनायक पोतनीस – मुंबई पदवीधर
निरंजन वसंत डावखरे – कोकण पदवीधर
किशोर भिकाजी दराडे – नाशिक शिक्षक
कपिल हरिश्चंद्र पाटील – मुंबई शिक्षक

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -