Monday, May 20, 2024
Homeनिवडणूक २०२४Devendra Fadnavis : शरद पवारांना आता पक्ष चालवणे शक्य नाही : देवेंद्र...

Devendra Fadnavis : शरद पवारांना आता पक्ष चालवणे शक्य नाही : देवेंद्र फडणवीस

‘भाजपाच मराठी माणसांच्या पाठीशी’

मुंबई : मराठी माणसाचे ठेकेदार ते नाहीत. ते म्हणजे महाराष्ट्र नाही. आम्हीही मराठी माणूस आहोत. आमचा पक्षही मराठी माणसाच्या पाठीशी आहे. खऱ्या अर्थाने मराठी माणसाला निर्वासित कुणी केले असेल, तर ते उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात झाले आहे, अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केली.

प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांच्या पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करण्याच्या विधानावरही भाष्य केले. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट हा जो पक्ष आहे, तो काँग्रेसमध्ये विलीन करावा, असे त्यांच्या डोक्यात असेल. त्यात काही नवल नाही. यापूर्वीही शरद पवारांनी अनेकवेळा पक्ष तयार केला आणि अनेकवेळा काँग्रेसमध्ये गेले. त्यामुळे त्यांनी हा एक संकेत दिला आहे की, आता त्यांचा पक्ष चालवणे त्यांना शक्य होणार नाही. लोकसभा निवडणुकीनंतर शरद पवार साहेबांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करतील, अशी प्रतिक्रिया प्रादेशिक पक्षांच्या विलिनीकरणाच्या शरद पवारांच्या भाकितावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील, शरद पवार

पुढील दोन वर्षात अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेससोबत समन्वयाने काम करतील किंवा काँग्रेस पक्षात विलीन होतील,असे मत शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबाबत मी सध्या काही बोलणार नाही. आमच्या सहकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतरच कोणताही निर्णय घेतला जाईल. मात्र,वैचारिकदृष्ट्या शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस हा आमचा पक्ष काँग्रेसच्या जवळचा पक्ष असल्याचे शरद पवार यांनी म्हटले आहे. शरद पवार यांनी इंग्रजी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत अनेक विषयावर सविस्तर मत व्यक्त केली.

महाराष्ट्राच्या राजकारणात शरद पवार यांच्या वक्तव्याला महत्त्व दिले जाते. त्यातच त्यांनी काँग्रेस पक्षाबाबत मोठे विधान केले आहे. देशातील राजकारणात अनेक राजकीय पक्ष आगामी काळात काँग्रेसमध्ये विलीन होतील, असा अंदाज शरद पवार यांनी व्यक्त केला आहे. शरद पवार यांच्या या अंदाजामुळे शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष देखील काँग्रेसमध्ये विलीन होणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. मात्र याबाबत देखील शरद पवार यांनी खुलासा केला आहे. सहकाऱ्यांशी चर्चा केल्याशिवाय मी काहीही बोलणार नाही. आमच्या पक्षाबाबत कोणतेही पाऊल उचलताना किंवा रणनीती ठरवताना सामूहिक पद्धतीने निर्णय घेतला जाईल, असे देखील पवार यांनी म्हटले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -