Sunday, May 19, 2024
HomeदेशAir India News : प्रवाशांची गैरसोय! एअर इंडियाची चक्क ७० हून अधिक...

Air India News : प्रवाशांची गैरसोय! एअर इंडियाची चक्क ७० हून अधिक उड्डाणे रद्द

जाणून घ्या नेमकं प्रकरण काय?

मुंबई : अलीकडे झालेले विस्तारा एअरलाइनवरील संकट निवळले नसून इतक्यात एअर इंडियाला (Air India) आणखी नव्या संकटाला सामोरे जावे लागत आहे. एअर इंडिया एक्सप्रेसने आपली ७० हून अधिक उड्डाणे रद्द केली आहेत. यामुळे प्रवाशांची गैरसोय होत असून त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. टाटा समूहाच्या विमान कंपनीच्या प्रवक्त्याने निवेदनात रद्द करण्यात आलेल्या उड्डाणांमध्ये आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत उड्डाणांचा समावेश असून उड्डाणे रद्द होण्याचे कारण सांगितले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एअरलाइनच्या वरिष्ठ क्रू मेंबर्सनी एकाचवेळी आजारी असल्याची रजा (sick leave) दिली आहे. त्यामुळे एअरलाईनला आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत उड्डाणे रद्द करावी लागली आहेत. क्रू मेंबर्स अचानक रजेवर गेल्याने वादाचे संकेत मिळत आहेत. हे प्रकरण नागरी विमान वाहतूक विभागापर्यंत पोहोचले असून अधिकारी या प्रकरणात हस्तक्षेप करत आहेत.

दरम्यान, अचानक विमान उड्डाणे रद्द झाल्याने प्रवाशांनी संताप व्यक्त केला आहे. एअर इंडिया एक्सप्रेसच्या प्रवक्त्याने सांगितले की, “एअरलाइनच्या केबिन क्रूच्या एका गटाने मंगळवारी रात्री शेवटच्या क्षणी आजारपणाच्या सुट्ट्या घेतल्या. ज्यामुळे फ्लाइटला उशीर करावा लागला आणि फ्लाइट रद्द करण्यात आली”.

“या घटनांमागील कारणे समजून घेण्यासाठी आम्ही क्रूशी चर्चा करत आहोत. एअरलाइन टीम सक्रियपणे या समस्येकडे लक्ष देत आहेत आणि समस्येचे निराकरण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. प्रवाशांना झालेल्या गैरसोयीबद्दल एअरलाइन दिलगिरी व्यक्त करतो”. “फ्लाइट रद्द झाल्यामुळे प्रभावित झालेल्या प्रवाशांना पूर्ण परतावा दिला जाईल. किंवा इतर तारखेला फ्लाइट निश्चित होईल, असंही प्रवक्त्याने सांगितलं आहे. प्रवाशांनी विमानतळावर येण्यापूर्वी त्यांचे उड्डाण रद्द झाले आहे की नाही हे तपासावे”, असे आवाहन देखील एअर इंडियाकडून करण्यात आले आहे

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -