Monday, May 20, 2024
Homeताज्या घडामोडीGoogle Pixel 8a भारतात लाँच, ही आहे किंमत

Google Pixel 8a भारतात लाँच, ही आहे किंमत

मुंबई: Google Pixel 8a भारतात लाँच करण्यात आला आहे. या हँडसेटमध्ये अनेक दमदार फीचर्स, जबरदस्त कॅमेरा तसेच हाय रिफ्रेश रेट्स डिस्प्ले देण्यात आला आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये लाँच करण्यात आलेल्या Pixel 8 मालिकेतील हा सर्वात परवडणारा फोन आहे. Pixel 7a तुलनेत Pixel 8a ची किंमत अधिक आहे. या स्मार्टफोनमध्ये Tensor G3 चिपसेट, 120Hz OLED डिस्प्ले आणि 64MP कॅमेरा देण्यात आला आहे.

Google Pixel 8aच्या किंमतीबाबत बोलायचे झाल्यास याची सुरूवातीची किंमत ५२,९९९ रूपये आहे. यात १२८ जीबी इंटरनल स्टोरेज मिळते. तर२५६ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत ५९,९९९ रूपये आहे. ई कॉमर्स वेबसाईट फ्लिपकार्टवर याची प्रीऑर्डर सुरू झाली आहे. याची पहिली सेल १४ मेला सकाळी साडेसहा वाजता सुरू होईल.

गुगल ४ हजारांची बँक ऑफर देत आहे. काही निवडक बँकांवर नो कॉस्ट ईएमआयचाही पर्याय आहे. यासोबतच ९ हजार रूपयांचा एक्सचेंज बोनसही देत आहे.

स्पेसिफिकेशन

6.1-inch FHD+ OLED डिस्प्ले
120Hz चा रिफ्रेश रेट्स, 1400Nits HDR ब्राइटनेस
2000 Nits चा पीक ब्राइटनेस आणि Gorilla Glass 3 प्रोटेक्शन
8GB LPDDR5x RAM
१२८ जीबी रॅम
२५६ जीबी स्टोरेज
ड्युएल कॅमेरा सेटअप
६४ एमपी प्रायमरी कॅमेरा
१३ एमपी अल्ट्रा वाईड कॅमेरा
Magic Editor, Best Take आणि Audio Magic Eraser

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -