Wednesday, June 26, 2024
Homeकोकणसिंधुदुर्गइन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची वेबसाइट स्लो

इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची वेबसाइट स्लो

संतोष राऊळ

कणकवली : इन्कम टॅक्स रिटर्न भरण्यासाठी ३१ जुलैपर्यंतची मुदत आयकर विभागाने दिलेली आहे. मात्र ऑनलाइन पद्धतीने इन्कम टॅक्स भरताना जनतेला अनंत अडचणींना सामोरे जावे लागत आहे. मुख्यतः भारत सरकारची https://www.incometax.gov.in एकच वेबसाइट असल्यामुळे सध्या ही साइट अपेक्षेपेक्षाही खूपच स्लो चाललेली आहे. त्यामुळे गत वर्षीप्रमाणे इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची मुदत वाढून मिळावी, अशी मागणी केली जात आहे.

इन्कम टॅक्स रिटर्न भरणाऱ्यांची संख्या गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात वाढली आहे. भारत सरकारची एकच वेबसाइट असल्यामुळे जून-जुलै या महिन्यात टॅक्स भरण्याचा अंतिम टप्पा असल्याने वेबसाइटवर गर्दी असते व लोड असल्याने ही वेबसाइट फारच स्लो झालेली असते. आजघडीला एआयएस ओपन होत नाहीये. एआयएस ओपन होण्यास अनेक वेळा अडचणी येत आहेत.

आधार ओटीपी ग्राहकापर्यंत पोहोचत नाही, तर रिटर्न फाइल अपलोड करताना वेबसाइट स्लो असल्यामुळे अर्ध्यावरच डिस्कनेक्ट होते. दुसरी गोष्ट म्हणजे क्रोम पेजवर ही वेबसाइट ओपनच सध्या होत नाहीये. त्यामुळे सीए आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांसमोर फार मोठे प्रश्न निर्माण झालेले आहेत. इन्कम टॅक्स भरण्याच्या मुदतीचे फक्त ८ दिवस शिल्लक राहिलेले आहेत. असे असताना वेबसाइट स्लो झाल्यामुळे काम खोळंबले आहे. गत वर्षी ही इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची मुदत पहिल्यांदा सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आली होती. या वर्षीसुद्धा तशी ती वाढवली जावी, अशी मागणी सीए आणि त्यांच्या ग्राहकांकडून केली जात आहे.

इन्कम टॅक्स रिटर्न भरण्यासाठी आधी तुम्हाला आयकर https://www.incometax.gov.in या अधिकृत पोर्टलवर जावे लागते. तुमचा पॅन तपशील, पासवर्ड आणि कॅप्चा कोड प्रवीष्ट केल्यानंतर ई-फाइलिंग पोर्टलवर लॉग इन करावे लागते. मात्र ही प्रक्रिया खूपच धिम्यागतीने चालल्यामुळे फाइल अपलोड होत नाहीत. त्याबद्दल सरकारने तातडीने निर्णय घ्यावा आणि मुदतवाढ करावी, अशी मागणी होत आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -