Wednesday, April 30, 2025

कोकणताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूजसिंधुदुर्ग

उद्धव ठाकरेंनी कोकणाच्या जनतेची माफी मागावी; आमदार नितेश राणे यांनी दिला इशारा

उद्धव ठाकरेंनी कोकणाच्या जनतेची माफी मागावी; आमदार नितेश राणे यांनी दिला इशारा

कणकवली : कोकणी माणूस स्वाभिमानी आहे. तो वेळेत कर्जफेड करतो, कुठलाही जिल्हा बँककडे जावा शून्य टक्के एनपीए असतो. आमच्या कोकणातला मतदार आणि कोकणातली जनता स्वाभीमानी आहे. त्यांच्यावर पैसे खाण्याचे, तुम्ही आरोप कराल तर आम्हाला कडक भूमिका घ्यावीच लागेल, असा इशारा भाजपा आमदार नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे व संजय राऊत यांना दिला. उद्धव ठाकरेंच्या विकास विरुद्ध, रोजगार विरुद्ध प्रवृत्तीला लोकसभा निवडणुकीत जनतेनेच नाकारले. त्यामुळे कोकणच्या सामान्य जनतेचा, सामान्य मतदारांचा अपमान करण्याचे काम उद्धव ठाकरे अन त्यांचे सहकारी करत आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी कोकणाच्या जनतेची माफी मागावी, अशी मागणी त्यांनी केली.

आ. नितेश राणे यांनी कणकवलीत पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले, कोकणातल्या जनतेने लोकशाही पद्धतीने उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला नाकारले आणि हे सत्य खासदार नारायण राणेंनी जेव्हा व्यक्त केले, येथील लोकांना सांगितलं तेव्हा अपेक्षेप्रमाणे मातोश्रीला आणि संजय राजाराम राऊत यांना मिरच्या लागल्या. पैसे घेऊन मतदान केले. हे संजय राजाराम राऊत म्हणतोय. म्हणजे त्यांचा असा अर्थ आहे का? की कोकणातला सामान्य मतदार हा पैसा खातो?

आमच्या कोकणातली जनता एवढी स्वाभिमानी आहे की, आत्तापर्यंत कधीही कोणत्याही सरकारकडे कर्जमाफी मागितली नाही. घेतलेले कर्ज वेळेत परतफेड करणे ही आमच्या कोकणातल्या जनतेची सवय आहे. आणि म्हणूनच राज्य सरकारकडून नेहमी प्रोत्साहनकारक निधी त्यांना जाहीर केली जाते. आमच्या कोकणातल्या स्वाभिमानी जनतेचा अपमान अशा पद्धतीने कोण करत असेल तर कोकणातली जनता धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही. उद्धव ठाकरेंना कोकणातली जनता समजली नाही, असा घणाघाती टोला आमदार राणे यांनी लगावला.

Comments
Add Comment