Wednesday, June 26, 2024
Homeताज्या घडामोडीGold-Silver Rate Hike : सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री; सोनं-चांदीच्या दराला सुवर्णझळाळी!

Gold-Silver Rate Hike : सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री; सोनं-चांदीच्या दराला सुवर्णझळाळी!

जाणून घ्या सध्याचे दर काय?

नवी दिल्ली : गेल्या महिन्यात सोन्याने विक्रमी पातळी गाठली होती. मात्र, त्यानंतर सोन्याची किंमत काहीशी कमी झाली होती. पण अलीकडे होणाऱ्या घडामोडींमुळे सोनं आणि चांदीच्या किंमती पुन्हा एकदा उसळी घेण्याचा अंदाज जाणकारांनी दिला आहे. येत्या काही दिवसांत अमेरिकेची केंद्रीय बँक फेड रिझर्व्ह ही व्याजदर कपात करणार असल्यामुळे याचा परिणाम सोन्याच्या किंमतीवर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे सोनं- चांदीच्या दरात आणखी वाढ होणार असून सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री बसणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, फेड रिझर्व्हने व्याजदरात कपात करण्याची घोषणा केल्यापासून सोने-चांदीच्या दरांमध्ये दररोज चढ-उतार पाहायला मिळत आहेत. मंगळवारी, बाजार उघडताच सोन्या आणि चांदीच्या दरात पुन्हा एकदा वाढ नोंदवली गेली असून सराफा बाजारात सोन्याचा भाव ७५,३२० रुपये प्रति १० ग्रॅम झाला तर सोन्यापाठोपाठ सर्वाधिक मागणी असलेल्या चांदीची किंमतही प्रति किलो १०० रुपयांनी महागली आहे. चांदी आतापर्यंतच्या उच्चांकावर उसळी घेत ९६,००० रुपये प्रति किलोच्या पुढे व्यवहार करताना दिसत आहे.

दरम्यान, राजधानी दिल्लीत मंगळवारी २४ कॅरेट सोन्याचा भाव ७५,३२० रुपये प्रति १० ग्रॅम झाला तर अहमदाबाद आणि वडोदरामध्ये २४ शुद्ध सोन्याचा भाव ७५,२२० रुपये आहे. याशिवाय मुंबई, कोलकाता, पुणे, केरळ, बेंगळुरू आणि हैदराबाद या आर्थिक शहरांमध्ये २४ कॅरेट सोन्याची किंमत ७५,१७० रुपये प्रति १० ग्रॅमच्या आसपास व्यापार करत आहे. तसेच सोन्यानंतर सर्वाधिक मागणी असलेल्या चांदीच्या दरात विक्रमी वाढ नोंदवली गेली आहे. त्यामुळे सध्याची दरवाढ पाहता चांदीचा भाव लवकरच एक लाख रुपये किलोपर्यंत पोहोचेल, असे जाणकारांचे म्हणणे आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -