Wednesday, June 26, 2024
Homeताज्या घडामोडीSharad Mohol Case : अखेर शरद मोहोळ हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी पुणे...

Sharad Mohol Case : अखेर शरद मोहोळ हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी पुणे पोलिसांच्या ताब्यात

थरारक पाठलाग करत पकडले!

पुणे : कुख्यात गुंड शरद मोहोळ हत्या प्रकरणातील (Sharad Mohol Case) मुख्य आरोपी पुणे पोलिसांच्या (Pune Police) हाताला लागला आहे. अनेक दिवसांपासून फरार असलेल्या गणेश मारणे (Ganesh Marne) याला थरारक पाठलाग करुन पकडण्यात पुणे पोलिसांनी मोठे यश मिळवले आहे. नाशिक रोड येथून त्याला अटक करण्यात आली. आतापर्यंत या हत्या प्रकरणात गणेश मारणे, विठ्ठल शेलार यांच्यासह १६ जणांवर मोक्का (Pune Police MCOCA Action) लावण्यात आला.

मोहोळ हत्या प्रकरणात आतापर्यंत साहिल उर्फ मुन्ना पोळेकर हा मुख्य आरोपी असल्याचे मानले जात होते. पोळेकरने इतर साथीदारांसोबत या हत्तेचा कट रचल्याचे प्राथमिक तपासातून समोर आले होते. मात्र, पोलीस तपासात अनेक गोष्टी समोर आल्यानंतर अनेकजण पोलिसांच्या रडारवर आले आहेत. पुणे पोलिसांनी आज नाशिकमधून या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेला गणेश मारणे याला अटक केली आहे.

पुण्यात शरद मोहोळची ५ जानेवारी रोजी दिवसाढवळ्या गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या घटनेने पुण्यासह राज्यात एकच खळबळ उडाली होती. शरद मोहोळ हत्या प्रकरणात २० हून अधिक जणांना अटक करण्यात आली आहे. हत्या झाल्यानंतर काही तासांमध्ये सात जणांना अटक करण्यात आली. त्यानंतर १५ जानेवारी रोजी पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने दहा जणांना पनवेल आणि वाशीमधून अटक केली. विठ्ठल शेलार, रामदास उर्फ वाघ्या मारणे यासह दहा जणांना गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकून अटक केली होती.

पुणे पोलिसांकडून आतापर्यंत २४ जणांना अटक

पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने शरद मोहोळ हत्येप्रकरणी जवळपास २४ जणांना बेड्या ठोकल्या आहेत. साहिल उर्फ मुन्ना संतोष पोळेकर, नामदेव महिपती कानगुडे, अमित ऊर्फ अमर मारुती कानगुडे, चंद्रकांत शाहू शेळके, विनायक संतोष गव्हाणकर, विठ्ठल किसन गांदले, ॲड. रवींद्र पवार, ॲड. संजय उडान, विठ्ठल शेलार, रामदास ऊर्फ वाघ्या मारणे, धनंजय मारुती वटकर, सतीश संजय शेडगे, नितीन अनंता खैरे, आदित्य विजय गोळे, संतोष दामोदर कुरपे यांना ताब्यात घेण्यात आले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -