Tuesday, June 25, 2024
Homeताज्या घडामोडीआशियाई देशांत जीवघेणा उन्हाळा! भारतात आठ राज्ये तापली

आशियाई देशांत जीवघेणा उन्हाळा! भारतात आठ राज्ये तापली

प्राण्यांचा तडफडून मृत्यू ; अनेक देशांमध्ये शाळा बंद; एल निनोमुळे तापमानात विक्रमी वाढ

नवी दिल्ली : आशिया व दक्षिण आफ्रिकेतील देशांमध्ये तीव्र उन्हाळा सुरू आहे. अनेक देशांमध्ये पारा ४५ अंशांच्या पुढे गेला आहे. अमेरिकेच्या नॅशनल आेसियानिक ॲटमॉस्फेरिक ॲडमिनिस्ट्रेशनच्या अहवालात म्हटले आहे की, अनेक देशात रात्रीही उष्णतेच्या लाटा येत आहेत. पश्चिम आशियातील सिरिया, इस्रायल,पॅलेस्टाइन, जाॅर्डन, लेबनॉनमध्ये उष्णता पाचपट वाढली आहे.

इस्रायल-पॅलेस्टाइनच्या युद्धस्थितीमुळे उष्णता वाढली असल्याचे तत्ज्ञांचे मत आहे. त्यामागे एल नीनो देखील कारण आहे. घातक उष्णतेच्या लाटेचे हे आशियातील तिसरे वर्ष आहे. प्रशांत महासागरातील उष्ण वाऱ्यामुळेही जगभरात उष्णता आहे. पाकिस्तानच्या जॅकोबाबादमध्ये सर्वाधिक ४८ अंश तापमान होते.

पाऊस व पुरामुळे हैराण झालेल्या पाकिस्तानात उष्णतेची लाट सुरू आहे. अनेक भागांत तापमानाने अर्धशतक नोंदवले आहे. त्यामुळे परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. ३१ मे पर्यंत शाळा बंद ठेवल्या आहेत. व्हिएतनाममध्ये तलावांतून मृत मासे आढळून आले आहेत. अनेक तलाव तर आटले असून सरकारने लोकांना घरातच राहण्याचा सल्ला दिला आहे. मेक्सिकोमध्ये झाडावरून पडून अनेक माकडांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत १३८ माकडांचा मृत्यू झाला. बांगलादेशमध्ये उष्णतेच्या लाटेत ३० हून जास्त लोकांचा मृत्यू झाला. शाळा-महाविद्यालये बंद ठेवण्यात आली आहेत. म्यानमारला एप्रिलमध्ये उष्णतेची लाट सुरू झाली. अगदी १० मेपर्यंत दररोज ४० जणांचा त्यामुळे मृत्यू झाला. कंबोडियन वाईल्ड लाईफ सेंच्युरीमध्ये तहानेने अनेक जनावरे मृत्यू पावली. व्हिएतनाममध्ये तलावांत मासे मरून पडले.

राजस्थानमध्ये पारा ४८ अंशांच्या पुढे

या वर्षी उन्हाळा जीवघेणा ठरला आहे. दिवसेंदिवस उष्णतेचा पारा वाढत आहे. उत्तर भारतातील आठ राज्यांमध्ये पारा ४३ अंशांच्या वर गेला आहे. राजस्थानच्या अनेक भागात तर तापमान ४८ अंशांच्या पुढे गेले आहे. गुजरातमध्येही तापमान ४५ अंशाच्या पुढे आहे. दरम्यान, पुढील काही दिवसांत उष्णता आणखी वाढण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने व्यक्त केली आहे. येत्या काही दिवसांत उत्तर-पश्चिम भारतात तीन ते चार अंशांनी तापमान वाढण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.

राजस्थान, पंजाब, हरियाणा, चंदीगड, दिल्ली आणि पश्चिम उत्तर प्रदेशसाठी ‘रेड अलर्ट’ जारी केला आहे. सर्व वयोगटातील लोकांना उष्णते संबंधित आजारां विषयी काळजी घेण्याचा इशारा दिला आहे. आयएमडीनुसार, उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा, दिल्ली आणि राजस्थानमध्ये पुढील चार दिवसांत रात्रीच्या उष्णतेमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.

बाडमेरमध्ये तर या वर्षातील आतापर्यंतचे सर्वाधिक तापमान नोंदवले गेले. दिल्लीतील यमुना नदीच्या पाण्याची पातळीही घसरली आहे. देशाच्या काही भागात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. केंद्रीय जल आयोगाच्या म्हणण्यानुसार, भारतातील १५० प्रमुख जलाशयांमधील पाणीसाठा गेल्या आठवड्यात पाच वर्षांतील नीचांकी पातळीवर गेला. त्याच जलविद्युत निर्मितीवर परिणाम झाला आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -