Wednesday, July 3, 2024
Homeताज्या घडामोडीपुण्यापाठोपाठ बारामतीत एकाच रात्रीत १६ घरांवर दरोडा

पुण्यापाठोपाठ बारामतीत एकाच रात्रीत १६ घरांवर दरोडा

बारामती, पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या बारामती येथे एका रात्रीत १६ घरफोड्या (Robbery) झाल्या आहेत. बारामती शहरातील देसाई इस्टेट जवळ आणि बारामती शहरात एका रात्रीत चोरट्यांकडून तब्बल १६ घरफोड्या झाल्याची घटना उघडकीस आल्याने परिसरात भीतीचे वातावरण आहे. या घरफोडीमध्ये सोने-चांदी, रोख रक्कम चोरीला गेल्याची माहिती मिळत आहे.

चोरट्यांनी बंद घरे फोडली आहेत. या चोरीत जवळपास २५ तोळे सोने चांदी आणि १ लाख रुपये कॅश लंपास केली आहे. बारामती शहर पोलिसांनी आणि पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने घटनास्थळी भेट देऊन घटनेची पाहणी केली.

मागील काही दिवसांपासून बारामतीत चोरीचे प्रमाण वाढले असल्याचे बोलले जात आहे. चोरांचे प्रमाणही वाढल्याचे चोरीच्या घटनांवरुन स्पष्ट होत आहे. एकाच रात्रीत एक दोन नाही तर तब्बल १६ घरं फोडल्याची घटना समोर आल्याने खळबळ उडाली आहे.

काही दिवसांपूर्वी बारामतीतील शहरातील देवकाते नगर परिसरात देवकाते पार्क येथील एका घरात घुसून चोरट्यांनी ६३ लाख १५ हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेला होता. महत्वाचं म्हणजे चोरांनी थेट घरातील महिलेचे हात पाय बांधून ठेवले होते आणि त्यानंतर घरावर दरोडा टाकला होता. जमीन खरेदीसाठी आणून ठेवलेली ५५ लाख रुपयांची रोख रक्कम तसेच सोन्याची चैन, मिनी गंठण, अंगठी, कर्णफुले, मोबाईल असा जवळपास ६३ लाख रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरुन नेला होता. या घटनेमुळे बारामतीत खळबळ उडाली होती. महिलेचे हातपाय बांधून चोरी करणं गंभीर बाब आहे. या घटनेनंतर एकट्या महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा समोर आला होता. त्यासोबत पोलिसांच्या कामावरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते.

दरम्यान, पुण्यात गेल्या काही महिन्यांपासून चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. एकीकडे कोयता गँगची दहशत असतानाच दरोडा, मोबाईल फोन, दागिन्यांच्या चोरीच्या घटना वाढत आहेत. त्यातच उदरनिर्वाहासाठी आता चोर चोरीसाठी नव्या वस्तूंचा आधार घेताना दिसत आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -