Monday, July 22, 2024
Homeक्रीडाश्रीलंका दौऱ्यापासून भारताचा नवा प्रशिक्षक रुजू

श्रीलंका दौऱ्यापासून भारताचा नवा प्रशिक्षक रुजू

जय शहा यांची माहिती

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : टीम इंडियाचे नवे मुख्य प्रशिक्षक कोण? या प्रश्नाचे उत्तर लवकरच मिळणार आहे. श्रीलंका दौऱ्यापासून टीम इंडियाला नवा मुख्य प्रशिक्षक मिळणार असल्याचे बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी सोमवारी सांगितले. वृत्तसंस्थेने याबाबत माहिती दिली आहे.

वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, निवडक माध्यमांशी बोलताना जय शहा म्हणाले की, प्रशिक्षक आणि निवडकर्ते दोघेही लवकरच नियुक्त केले जातील. सीएसीने मुलाखती घेतल्या आहेत आणि दोन नावे निश्चित केली आहेत. मुंबईत पोहोचल्यानंतर त्यांनी जो काही निर्णय घेतला आहे, आम्ही त्यानुसार जाऊ. व्हीव्हीएस लक्ष्मण झिम्बाब्वे दौऱ्यावर जाणार आहे. परंतु नवीन प्रशिक्षक श्रीलंका मालिकेपासून मिळणार आहे, असे जय शहा म्हणाले. भारतीय संघाला २७ जुलैपासून तीन टी-२० आणि तितक्याच एकदिवसीय सामन्यांसाठी श्रीलंका दौऱ्यावर जायचे आहे.

बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी सोमवारी सांगितले की, या महिन्याच्या अखेरीस श्रीलंकेत सुरू होणाऱ्या मर्यादित षटकांच्या मालिकेपूर्वी भारतीय क्रिकेट संघाला नवीन मुख्य प्रशिक्षक मिळेल. मात्र राहुल द्रविडची जागा नक्की कोण घेणार? हे स्पष्ट केले नाही. द्रविडच्या जागी माजी सलामीवीर गौतम गंभीर भारताच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्त होण्याची शक्यता आहे. क्रिकेट सल्लागार समितीने या कोचपदासाठी मुलाखती देखील घेतल्या आहेत. मात्र नव्या प्रशिक्षकाचे नाव जाहीर केलेले नाही.

बीसीसीआयने नोव्हेंबर २०२१ मध्ये राहुल द्रविड यांची भारताचा मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली. २०२३ मध्ये झालेल्या एकदिवसीय विश्वचषकानंतर द्रविडचा कार्यकाळ संपला होता. मात्र टी-२० विश्वचषक २०२४ पर्यंत द्रविड यांना मुदतवाढ देण्यात आली होती. दरम्यान नुकत्याच संपलेल्या टी-२० विश्वचषक २०२४ स्पर्धेनंतर द्रविड यांचा कार्यकाल संपुष्टात आला आहे. त्याजागी नव्या मुख्य प्रशिक्षकाची लवकरच नियुक्ती केली जाणार आहे.

दरम्यान जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात टीम इंडिया श्रीलंकेच्या दौऱ्यावर जाणार आहे. तिथे दोन्ही संघांमध्ये ३ एकदिवसीय आणि ३ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांची मालिका होणार आहे. ही मालिका २७ जुलैपासून सुरू होणार आहे. या दौऱ्यापासून भारतीय संघाला नवा मुख्य प्रशिक्षक मिळणार आहे. दरम्यान या स्पर्धेत गौतम गंभीर यांचे नाव पुढे आहे. गंभीरने सलामीवीर म्हणून भारतासाठी शानदार कामगिरी केली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -