
हाथरस : उत्तर प्रदेशच्या हाथरसमध्ये सत्संगात चेंगराचेंगरी होऊन भीषण दुर्घटना घडली असून यामध्ये १२२ जणांचा मृत्यू झाला. हाथरसमधील रतिभानपूर येथे ही दुर्घटना घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, हाथरस शहरात सोमवारी भोले बाबांचा सत्संग समारंभाच्या समारोप प्रसंगी भयंकर गर्दी झाली. या घटनेत १२२ जणांचा मृत्यू झाला. तर १०० लोकं जखमी झाली आहेत.
मोठ्या प्रमाणावर गर्दी आणि अव्यवस्थित व्यवस्थापन यामुळे ही दुर्घटना घडली. या चेंगराचेंगरीत जखमी झालेल्या लोकांना उपचारासाठी एटा मेडिकल कॉलेजमध्ये नेण्यात आले आहे.