Monday, July 22, 2024
Homeक्रीडातुम्ही मला नेहमीच प्रोत्साहन दिले! विराट कोहलीने मानले पंतप्रधान मोदींचे आभार

तुम्ही मला नेहमीच प्रोत्साहन दिले! विराट कोहलीने मानले पंतप्रधान मोदींचे आभार

बार्बाडोस : आदरणीय नरेंद्र मोदी सर, तुमचे शब्द आणि पाठिंबा यासाठी तुमचे खूप खूप आभार. तुम्ही मला नेहमीच प्रोत्साहन दिले आहे, अशा शब्दांत टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहलीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले.
विराट कोहलीने अलीकडेच टी-२० विश्वचषक फायनल जिंकल्यानंतर या फॉरमॅटमधून निवृत्ती जाहीर केली होती. यानंतर पंतप्रधान मोदींनी एक खास पोस्ट केली होती. या पोस्टवर प्रतिक्रिया देताना विराट कोहलीने पंतप्रधान मोदींचे आभार मानले. विराट कोहलीने पोस्टमध्ये लिहिले की, आदरणीय नरेंद्र मोदी सर, तुमचे शब्द आणि पाठिंबा यासाठी तुमचे खूप खूप आभार, तुम्ही मला नेहमीच प्रोत्साहन दिले आहे. विश्वचषक ट्रॉफी मायदेशात आणणाऱ्या या संघाचा एक भाग असणं, ही माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे. यामुळे देशवासीयांना झालेला आनंद पाहून आम्हीही खूप भारावून गेलो आहोत.

भारतीय संघाने टी-२० विश्वचषक उंचावल्यानंतर या संघातील सदस्य आणि टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहलीने टी-२० फॉरमॅटमधून निवृत्ती जाहीर केली. त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विराटबद्दल पोस्टमध्ये लिहिले होते, “प्रिय विराट कोहली, तुझ्याशी बोलून छान वाटलं. फायनलमधील खेळीप्रमाणे तू सातत्याने भारतासाठी दमदार कामगिरी केली आहेस. कसोटी, एकदिवसीय आणि टी-२० अशा तिन्ही प्रकारात तुझ्या बॅटने वर्चस्व गाजवलं आहेस. टी-२० प्रकारात आता तू नसशील पण या प्रकारात तुझं योगदान विसरता येणार नाही. पण मला खात्री आहे की तू नवीन पिढीच्या खेळाडूंना प्रेरणा देत राहशील.

टी-२० विश्वचषक २०२४ स्पर्धेत विराट कोहलीची कामगिरी खराब राहिली होती. मात्र त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या अंतिम सामन्यात ७६ धावांची निर्णायक खेळी खेळली. त्यामुळे टीम इंडियाला मोठी धावसंख्या उभारण्यात यश आले. विराटच्या या खेळीमुळे भारतीय संघाने सन्मानजनक धावसंख्या उभारली. तसेच या स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेला चितपट करत विश्वचषक उंचावला. या सामन्यानंतर विराट कोहलीने टी-२० क्रिकेटला अलविदा केला. तसेच रोहित शर्मा आणि रविंद्र जडेजा यांनीही निवृत्ती जाहीर केली.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -