Wednesday, July 17, 2024
Homeब्रेकिंग न्यूजGhatkopar hoarding accident case : होर्डिंग दुर्घटना प्रकरणाचे धागेदोरे मातोश्रीपर्यंत पोहोचले? भाजप...

Ghatkopar hoarding accident case : होर्डिंग दुर्घटना प्रकरणाचे धागेदोरे मातोश्रीपर्यंत पोहोचले? भाजप आमदारांची चौकशीची मागणी

मुंबई : घाटकोपर येथे १३ मे रोजी वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे पेट्रोल पंपावर मोठे होर्डिंग कोसळून १७ जणांचा बळी गेला होता. विधानसभेत घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेप्रकरणी (Ghatkopar hoarding accident case) लक्षवेधी मांडली गेली. यावेळी राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मुंबईतील सर्व होर्डिंगचे स्ट्रकचरल आँडिट करावे, अशी मागणी विधानसभेत केली. यावर सरकारतर्फे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी उत्तर दिले. ३० दिवसांत सर्व होर्डिंग स्ट्रक्चर ऑडिट करण्यात येईल, अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी दिली. हाच मुद्दा धरून भाजपा आमदार राम कदम यांनी होर्डिंग दुर्घटना प्रकरण हे थेट मातोश्रीशी जोडले.

राम कदम यांनी या प्रकरणात थेट उद्धव ठाकरे यांच्या चौकशीची मागणी सभागृहात केली. यावरून सभागृहात सत्ताधारी व विरोधक यांच्यामध्ये एकच गदारोळ पाहायला मिळाला. भाजपा आमदार राम कदम यांनी ज्या मातोश्रीत मंत्री लोकांना कोविडच्या काळात बंदी होती, त्याच मातोश्रीत आरोपी भावेश भिंडेला रेडकार्पेट टाकले गेले, असा आरोप केला. एवढेच नव्हेतर इगो मीडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा संचालक भिंडेला राजाश्रय असल्याशिवाय परवानगी मिळू शकत नाही, त्याच्या मागे कोण होते? कोविड काळात कशी परवानगी दिली गेली, असे सर्व प्रश्न राम कदम यांनी उपस्थित केले. तसेच कोविड काळातील आरोपी भिंडेचा मातोश्रीवरचा फोटो दाखवत हा फोटो नाकारू शकत नाही, असेही ते म्हणाले आणि चौकशीची मागणी देखील केली.

तर दुसरीकडे भाजपा आमदार नितेश राणे यांनी आरोपी भिंडेला मातोश्रीवर नेणारा आमदार दुसरा तिसरा कोणी नसून हे आमदार सुनिल राऊत आहेत असे थेट नाव घेतले. तसेच आरोपी भिंडेचा सीडीआर तपासावा अशी मागणी करत, सुनिल राऊतांवर आरोप केला आणि यावरून एकच गदारोळ सभागृहात झाला.

मात्र आमदार सुनिल राऊत यांनी नितेश राणेंचे आरोप फेटाळत जर आरोपी भिंडेशी काही संबंध निघाला तर मी राजीनामा देईन नाहीतर ज्यांनी आरोप केले त्यांनी राजीनामा द्यावा, असे प्रतिआव्हान आमदार सुनिल राऊत यांना दिले.

दरम्यान, घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील प्रमुख आरोपी भावेश भिंडेच्या मुलूंड येथील राहत्या घरी जाऊन पोलिसांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांची धाड पडण्यापूर्वीच तो फरार झाला होता. त्यानंतर त्याला मुंबई पोलिसांनी राजस्थानच्या उदयपूरमधून अटक केली होती. भावेश भिंडेची जाहिरात कंपनी दुर्घटनाग्रस्त होर्डिंगचे संचालन करत होती.

भावेश भिंडे याच्याविरोधात २३ फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याशिवाय त्याच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा देखील दाखल आहे. याचवर्षी २४ जानेवारी रोजी मुलुंड पोलीस ठाण्यात भावेशविरोधात बलात्कार आणि विनयभंगाची तक्रार दाखल करण्यात आली होती. याप्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने त्याचा अंतरिम जामीन मंजूर केला होता. भिंडे हा १९९८ पासून जाहिरातीच्या व्यवसायात असून त्याला आतापर्यंत १०० हून अधिक वेळा महापालिकेने दंड ठोठावला आहे. त्याचबरोबर त्याच्याविरोधात बलात्काराच्या एका गुन्ह्यासह एकूण ६ इतर गुन्हे दाखल असून यापैकी चार गुन्हे मुलुंड आणि दोन गुन्हे सांताक्रुझ पोलीस ठाण्यात दाखल आहेत.

भावेश भिंडे इगो मीडिया या कंपनीचा संचालक होण्याआधीच या कंपनीला घाटकोपर येथील जाहिरात फलकाची परवानगी मिळाली होती. त्यापूर्वीही भिंडेचे या कंपनीबरोबर व्यवहार झाल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली आहे. त्याची पडताळणी व तपासणी पोलीस करत आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -