Friday, May 10, 2024
Homeताज्या घडामोडीदिग्गज आयटी कंपनीच्या सीईओंच्या सल्ल्याने आयटी तज्ज्ञांसह कर्मचा-यांची उडाली झोप!

दिग्गज आयटी कंपनीच्या सीईओंच्या सल्ल्याने आयटी तज्ज्ञांसह कर्मचा-यांची उडाली झोप!

कॉम्प्युटर लँग्वेज-कोडिंग सोडा, आता बायोलॉजी, मॅन्युफॅक्चरिंग किंवा शेती करा

नवी दिल्ली : जगातील दिग्गज टेक कंपन्यांपैकी एक असणाऱ्या Nvidia चे सीईओ जेनसेन हुआंग (Jensen Huang) यांच्या एका वक्तव्याने आयटी क्षेत्रात खळबळ उडाली असून आयटी तज्ज्ञांसह कर्मचा-यांची देखिल अक्षरश: झोप उडाली आहे.

एकीकडे अन्य कंपन्यांचे सीईओ तरुणांना कॉम्प्युटर लँग्वेज आणि कोडिंग शिकण्याचा सल्ला देत असतात. मात्र हुआंग यांनी याच्या अगदी उलट सल्ला दिला आहे. प्रोग्रामिंग लँग्वेज आणि कोडिंग शिकण्याऐवजी आपण बायोलॉजी, मॅन्युफॅक्चरिंग किंवा शेती अशा गोष्टींवर लक्ष केंद्रित करायला हवे, असा सल्ला त्यांनी नवतरुणांना दिला आहे.

हुआंग हे दुबईमधील वर्ल्ड गव्हर्नमेंट समिटमध्ये बोलत होते. यावेळी त्यांनी एआयमुळे आपल्या जगावर किती प्रभाव पडला आहे याबाबत आपले मत व्यक्त केले. ते म्हणाले, की आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचा (Artificial Intelligence) हा अगदी सुरुवातीचा काळ आहे. मात्र आताच एआय एवढे प्रगत झाले आहे की ते कोडिंग देखिल करु लागले आहे. त्यामुळे तरुणांनी प्रोग्रामिंग लँग्वेज (Programing Language) शिकण्यावर वेळ वाया घालवण्याची आता गरजच उरलेली नाही.

“गेल्या १० ते १५ वर्षांपासून टेक फील्डमधील प्रत्येक उच्चपदस्थ व्यक्ती तरुणांना कॉम्प्युटर सायन्स (Computer Science) आणि प्रोग्रामिंग शिकण्यास सांगत आहेत. खरेतर परिस्थिती अगदी त्याच्या उलट आहे. कारण तंत्रज्ञान आता इतके पुढे गेले आहे की, कोणालाही प्रोग्रामिंग करण्याची गरज नसेल. एआयमुळे आज जगातील प्रत्येक व्यक्ती प्रोग्रामर झाला आहे”, असे ते म्हणाले.

हुआंग पुढे म्हणाले, “तरुणांनी आता अधिक उपयोगी असणाऱ्या कौशल्यांना विकसित करण्याकडे भर द्यावा. बायोलॉजी, शिक्षण, मॅन्युफॅक्चरिंग, फार्मिंग आणि अशा क्षेत्रांकडे तरुण लक्ष देऊ शकतात. कॉम्प्युटर प्रोग्रामिंग आता आपोआप होत आहे, त्यामुळे लोकांना केवळ आपल्या नेहमीच्या भाषांचीच गरज आहे.”

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -