Saturday, April 27, 2024
Homeराशिभविष्यसाप्ताहिक राशिभविष्यHoroscope : साप्ताहिक राशिभविष्य, ९ ते १५ एप्रिल २०२३

Horoscope : साप्ताहिक राशिभविष्य, ९ ते १५ एप्रिल २०२३

साप्ताहिक (Horoscope) राशिभविष्य, रविवार दि. ९ ते शनिवार १५ एप्रिल २०२३

अडचणी दूर होतील
मेष – मालमत्ता, जमीन-जुमला याविषयीची दीर्घकाळ रखडलेल्या कामांना गती मिळेल. चांगल्या बातम्या मिळतील. सरकारी महत्त्वाची कामे विनाविलंब होण्याची शक्यता आहे. अडचणी दूर होतील. नोकरीमध्ये प्रगतीच्या दृष्टिकोनातून अनुकूल कालावधी. उन्नती, प्रगती होईल. वरिष्ठ आपल्या कामावरती खूश राहतील. आपल्या कामाची प्रशंसा होईल. कौतुकास पात्र ठराल. जर नोकरीत बदल करायचा असेल, तर त्या दृष्टीने प्रयत्न करण्यासाठी उत्तम काळ आहे. प्रयत्नांना यश मिळेल. ओळखीचे फायदे होतील. समाजातील मान्यवरांकडून मदत तसेच सहकार्य मिळू शकते. आर्थिक कामे सावधानतेने करा.
आर्थिक आवक उत्तम
वृषभ – मनोरंजन तसेच मौजमजेकडे कल राहील. मित्रमंडळींच्या वर्तुळात प्रिय राहाल. जवळच्या अथवा लांबच्या प्रवासाचे नियोजन करू शकाल. खर्च वाढेल. स्वतःसाठी आणि कुटुंबासाठी खरेदी होईल. प्रवासात काळजी घ्या. वाहने जपून चालवा. जीवनसाथी आपल्या मनासारखे वागेल. नोकरीत अनुकूल परिस्थिती राहील. सहकाऱ्यांचे सहकार्य अपेक्षेनुसार मिळत राहील. कुटुंब परिवारातील वातावरण सुखद राहील. निसर्गरम्य ठिकाणी फिरण्यास जाण्याचे योग आहेत. आर्थिक आवक उत्तम राहील. स्वतःचा छंद, कला वाढविण्यासाठी वेळ मिळेल. चांगल्या पुस्तकांचे वाचन होईल. हितचिंतकांच्या सहवासात वेळ चांगला जाईल.
खर्चात वाढ होईल
मिथुन – हा आठवडा खर्चात वाढ करू शकतो. कुटुंब परिवारातील सदस्यांच्या वाढत्या मागण्या पूर्ण कराव्या लागतील. तसेच रोजच्या वापरातील उपकरणे यावर खर्च होऊ शकतो. वाहनाच्या देखभालीच्या खर्चावर वाढ होईल. तसेच घरातील भौतिक सुखसुविधा वाढविण्यासाठी खर्च करण्याची इच्छा होईल. आर्थिक आवक मनासारखी राहिल्याने मनसोक्त खर्च करू शकाल. चैनीवर खर्च करण्याकडे कल राहील. अनावश्यक खर्चाला कात्री लावणे हितकारक ठरेल. त्याचप्रमाणे एखाद्या कारणाने पैशाचा अपव्यय होऊ शकतो. नोकरीत सामान्य परिस्थिती राहील. महत्त्वाची कामे हातावेगळी कराल.
समाधानी राहाल
कर्क –कुटुंब परिवारामध्ये एखादे विवाहासारखे अथवा एखादे मंगल कार्य ठरल्यामुळे लगबग राहील. परिवारातील सर्वांचे अपेक्षित सहकार्य मिळू शकते. अचानक पाहुण्यांचे आगमन आश्चर्यचकित करू शकते. खर्चात वाढ होईल. कुटुंबाप्रती असलेल्या जबाबदाऱ्या पार पाडल्यामुळे आपण समाधानी राहाल. व्यवसाय-धंद्यात भरभराट होऊ शकते. उलाढाल वाढेल. फायद्याचे सौदे हाती येतील. मात्र सरकारी धोरणांचा व्यवसायावर परिणाम होऊ शकतो. नोकरीधंद्यात आपल्या कर्तृत्वाला वाव मिळेल. अधिकार कक्षा रुंदावतील. नवीन नवीन संधी उपलब्ध होतील. राहत्या घरासाठी अथवा घराच्या सुशोभीकरणासाठी खर्च होईल. एखाद्या नवीन कार्यक्षेत्राची ओळख होईल.
इच्छापूर्ती होईल
सिंह – मनासारखी कामे झाल्यामुळे तसेच सतत सकारात्मक प्रतिसाद देत राहिल्याने अनुकूलतेमध्ये भर पडेल. प्रत्येक क्षेत्रातील अपेक्षा पूर्ण होतील. कुटुंबातील सर्व सदस्यांचे अपेक्षित सहकार्य मिळत राहील. मनावरील ताण नाहीसा होईल. आरोग्य चांगले राहील. त्यामुळे आत्मविश्वासात वाढ होईल. आपल्यासमोरील कामे आपण वेगाने कराल. आर्थिक आवक चांगली राहिल्याने बचतीचे नियोजन नीट केले जाईल. कुटुंब परिवारातील तरुण-तरुणींचे प्रश्न संपुष्टात येतील. नोकरीविषयक केलेले प्रयत्न यशस्वी होतील. चालू नोकरीत दगदग होण्याची शक्यता आहे.
कार्यव्याप्ती वाढेल
कन्या – सुरुवातीपासूनच आपली कार्यव्याप्ती वाढेल. जास्तीची कामे करावी लागतील. कुटुंबातील तसेच आपल्या कार्यक्षेत्रातील कामे पूर्ण करण्यासाठी जास्त प्रयत्नांची गरज राहील. विशेषतः सरकारी कामे करताना वेळ व खर्च दोन्ही वाढू शकतो. स्वतःला शांत राहण्याची गरज आहे. संयम ठेवा, सबुरीने घ्या. आपल्या वागण्यावर आणि बोलल्यावर ती नियंत्रण ठेवणे गरजेचे राहील. काहींना प्रवास करावा लागेल. प्रवास जरी कार्य सिद्ध झाले तरी प्रवासात सामानांची आणि कागदपत्रांची काळजी घ्या. चोरी किंवा गहाळ होण्याची शक्यता आहे वाहनाच्या दुरुस्तीकडे वेळीच लक्ष द्या.
भरभराट होईल
तूळ –आपण केलेल्या अथवा घेतलेल्या कष्टाला फळ मिळेल. आपल्या धडपडीला या कालखंडात यश मिळेल. विविध प्रकारचे लाभ होऊ शकतात. व्यवसायाची भरभराट होईल. एखादे महत्त्वाचे कामजे आतापर्यंत पूर्ण होण्यामध्ये अनेक अडचणी निर्माण होत होत्या, असे काम पूर्ण करण्यात यश मिळेल. जमीन-जुमला, स्थायी संपत्ती याविषयी रखडलेले व्यवहार गतिशील होतील व पूर्णत्वाकडे वाटचाल करतील. ओळखी, मध्यस्थी उपयोगी पडतील. कुटुंबातील ज्येष्ठांचे मार्गदर्शन लाभेल. विद्यार्थ्यांना आपल्या आवडत्या क्षेत्रात काम करण्याची संधी मिळाल्यामुळे समाधान मिळेल.
अनुकूल परिस्थिती राहील
वृश्चिक – धनलाभाच्या दृष्टीने सप्ताह चांगली फळे देईल. अनेक मार्गांनी धनलाभ होऊ शकतो. विविध प्रकारच्या लाभांनी लाभान्वित व्हाल. चालू नोकरीत अपेक्षित घटना घडून पदोन्नती अथवा व्यक्तीविरुद्ध मिळू शकते. लहान-मोठे प्रवास करावे लागतील. जबाबदाऱ्यांमध्ये वृद्धी होण्याची शक्यता. व्यवसाय-धंद्यात नवीन नवीन संधी उपलब्ध होतील. व्यवसायिक जुनी येणी वसूल होतील. नवीन करार-मदार होऊ शकतात. काही फायद्याचे सौदे हाती येतील. तरुण-तरुणींच्या विवाहातील अडचणी दूर होतील. नोकरीविषयक प्रश्न सुटतील. चालू नोकरीत अनुकूल परिस्थिती राहील.
प्रवासाचे नियोजन कराल
धनु – कुटुंब परिवारातील व आपल्या व्यवसाय-धंद्यामध्ये सर्वांचे सहकार्य अपेक्षेप्रमाणे मिळत राहील. आर्थिक परिस्थिती चांगली राहील. विविध प्रकारचे लाभ होतील. कुटुंबात एखाद्या कार्यक्रमाचे नियोजन होऊ शकते. सहकुटुंब सहपरिवार प्रवासाचे नियोजन करावे लागेल. व्यवसाय-धंद्यात काही नवीन बदल करता येतील. व्यवसायात केलेले बदल पोषक ठरतील. घरातील कामे व नोकरी यांचा समन्वय साधावा लागेल. कार्याची व्याप्ती वाढल्याने कार्यमग्न राहाल. जमीन-जुमला-संपत्तीविषयीची कामे गतिमान होतील. ओळखी उपयोगी पडतील. व्यवसायात परिस्थिती समाधानकारक राहील. प्रवासाचे नियोजन कराल.
आनंददायक वातावरण
मकर – महत्त्वाच्या कामांमध्ये अचानक काही अडचणी उद्भवल्यामुळे काम पूर्ण होण्यास थोडासा अवधी लागेल. विलंबाने कामे होतील. निराश न होता आपल्या कार्यात कार्यमग्न राहा. प्रयत्न कमी पडून देऊ नका. नोकरीविषयक प्रयत्न सफल होतील. पूर्वी दिलेल्या नोकरीविषयक मुलाखती सफल होऊन नोकरीसाठी बोलावणे येईल. विद्यार्थ्यांना कॉलेज कॅम्पसमधून नोकरीसाठी निवड होऊ शकते. तरुण-तरुणींचे अर्थार्जन सुरू होईल. कुटुंब परिवारात आनंददायक वातावरण राहून नातेवाइकांच्या गाठीभेटी होतील. मुलांच्या यशाच्या वार्ता कानी पडतील. काहींचे विवाह ठरतील. परिचयोत्तर विवाह ठरण्याची शक्यता. परिवारात सहकार्य मिळेल.
वाद-विवाद दुर्लक्षित करा
कुंभ – आपल्या दैनंदिन कामात अडचणी निर्माण झाल्याने आपल्या स्वभावात चिडखोरपणा येईल. त्यामुळे इतरांवर राग निघण्याची शक्यता आहे. होणारे काम होणार नाही म्हणून आपल्या बोलण्यावर नियंत्रण ठेवणे गरजेचे राहील. कुटुंबातील सदस्यांचे मत शांतपणे ऐकून घ्या. विशेषतः जीवनसाथीबरोबर होणारे वाद-विवाद दुर्लक्षित करा. कुटुंबातील सदस्यांच्या मागण्या वाढण्याची शक्यता आहे तसेच राहत्या घरासाठी खर्च करावा लागेल. घरातील उपकरणे तसेच वाहने यांच्या देखभालीच्या खर्चामध्ये वाढ होऊ शकते. खर्चाचे प्रमाण वाढल्यासारखे वाटेल. पण खर्च आवश्यक असल्याने ते करावेच लागतील.
कर्तृत्वाला वाव मिळेल
मीन –आपल्या कर्तृत्वाला वाव मिळून कर्तृत्व सिद्ध करण्याच्या संधी मिळतील. नोकरीमध्ये आपल्या कामाचे कौतुक होऊन प्रशंसेस पात्र ठराल. एखादी महत्त्वाची जबाबदारी स्वीकारावी लागण्याची शक्यता. महत्त्वाच्या कामगिरीसाठी आपली निवड होऊ शकते. खेळाडू, कलाकार यांना अनुकूल कालावधी. केलेल्या कष्टाचे चीज होईल. प्रसिद्धीबरोबरच अर्थार्जनामध्ये वाढ होईल. एकूणच आर्थिक आवक चांगली राहिल्यामुळे खर्च स्वतः करू शकाल. कुटुंबासाठी तसेच स्वतःसाठी नवीन खरेदी होईल. राहत्या घरासाठी खर्च करावा लागेल. सुशोभीकरणासाठी खर्च होईल. व्यवसाय-धंद्यात विविध प्रकारचे लाभ होण्याची शक्यता.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -