Thursday, May 2, 2024
Homeराशिभविष्यWeekly Horoscope : साप्ताहिक भविष्य; १४ ते २० एप्रिल २०२४

Weekly Horoscope : साप्ताहिक भविष्य; १४ ते २० एप्रिल २०२४

साप्ताहिक राशिभविष्य, १४ ते २० एप्रिल २०२४

अडचणी दूर होतील

मेष : या आठवड्यात अनुकूल ग्रहमानाची साथ मिळाल्याने महत्त्वाची कामे हातावेगळी करता येतील. मालमत्ता, जमीन-जुमला याविषयीची दीर्घकाळ रखडलेल्या कामांना गती मिळेल. चांगल्या बातम्या मिळतील. सरकारी महत्त्वाची कामे विनाविलंब होण्याची शक्यता. अडचणी दूर होतील. नोकरीमध्ये प्रगतीच्या दृष्टिकोनातून अनुकूल कालावधी. उन्नती, प्रगती होईल. वरिष्ठ आपल्या कामावरती खूश राहतील. आपल्या कामाची प्रशंसा होईल. जर नोकरीत बदल करायचा असेल तर त्यादृष्टीने प्रयत्न करण्यासाठी उत्तम काळ आहे. प्रयत्नांना यश मिळेल. ओळखीचे फायदे होतील. समाजातील मान्यवरांकडून मदत तसेच सहकार्य मिळू शकते. सामाजिक कार्यात यश मिळेल.

वातावरण सुखद राहील
वृषभ :
मनोरंजन तसेच मौजमजेकडे कल राहील. मित्रमंडळींच्या वर्तुळात प्रिय राहाल. जवळच्या अथवा लांबच्या प्रवासाचे नियोजन करू शकाल, खर्च वाढेल. स्वतःसाठी आणि कुटुंबासाठी खरेदी होईल. प्रवासात काळजी घ्या. वाहने जपून चालवा. जीवनसाथी आपल्या मनासारखे वागेल. नोकरीत अनुकूल परिस्थिती राहील. सहकाऱ्यांचे सहकार्य अपेक्षेनुसार मिळत राहील. कुटुंब परिवारातील वातावरण सुखद राहील. निसर्गरम्य ठिकाणी फिरण्यास जाण्याचे योग आहेत. आर्थिक आवक उत्तम राहील. स्वतःचा छंद कला वाढविण्यासाठी वेळ मिळेल. चांगल्या पुस्तकांचे वाचन होईल. हितचिंतकांच्या सहवासात वेळ चांगला जाईल. व्यवसाय धंद्यामध्ये नवीन नवीन संधी उपलब्ध होण्याची शक्यता. व्यवसायिक जुनी येणी वसूल होतील. चिंता मिटतील. विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक यश मिळू शकते.
कौतुक होईल
मिथुन :
सदरचा कालावधी अनुकूल ठरेल. स्वतःच्या व्यक्तिमत्त्वाचा व कार्याचा प्रभाव इतरांवर पडेल. आपली महत्त्वाची कार्य शिग्रतेने पूर्ण होतील. व्यापार व्यवसायात घेतलेले निर्णय योग्य ठरतील. व्यवसायात नवीन संधी उपलब्ध होऊ शकतात. नवीन व्यवसाय सुद्धा सुरू करू शकाल. सरकार दरबारची कामे इतरांचे सहकार्य लाभल्यामुळे पूर्ण करू शकाल. व्यवसायातही कामगार वर्गाचे सहकार्य मिळू शकते. सरकारी स्वरूपाच्या नोकरीत आपली कार्य व्याप्ती वाढेल. नवीन कार्यभार सोपविला जाऊ शकतो; परंतु अधिकाऱ्याच्या मर्यादित राहूनच आपली कार्य आपण पूर्ण करावी. नियम व अटी पाळणे हितकारक ठरेल. कुटुंबातून तसेच बाहेरून सर्वांचे सहकार्य मिळाल्यामुळे आपण उत्साहाने नवीन जबाबदाऱ्या स्वीकारू शकाल.
अधिकार कक्षा रुंदावतील
कर्क :
कुटुंब परिवारामध्ये विवाहासारखे अथवा एखादे मंगल कार्य ठरल्यामुळे लगबग राहील. परिवारातील सर्वांचे अपेक्षित सहकार्य मिळू शकते. अचानक पाहुण्यांचे आगमन आश्चर्यचकित करू शकते. खर्चात वाढ होईल. कुटुंबाप्रती असलेल्या जबाबदाऱ्या पार पाडल्यामुळे आपण समाधानी राहाल. व्यवसाय धंद्यात भरभराट होऊ शकते. उलाढाल वाढेल. फायद्याचे सौदे हाती येतील. मात्र सरकारी धोरणांचा व्यवसायावर परिणाम होऊ शकतो. नोकरीधंद्यात आपल्या कर्तृत्वाला वाव मिळेल. अधिकार कक्षा रुंदावतील. नवीन संधी उपलब्ध होतील. राहत्या घरासाठी अथवा घराच्या सुशोभीकरणासाठी खर्च होईल. एखाद्या नवीन कार्यक्षेत्राची ओळख होईल.
अपेक्षित सहकार्य मिळत राहील
सिंह :
या आठवड्यात काही मनासारखी कामे झाल्यामुळे तसेच सतत सकारात्मक प्रतिसाद देत राहिल्याने अनुकूतेमध्ये भर पडेल. प्रत्येक क्षेत्रातील अपेक्षा पूर्ण होतील. विविध प्रकारच्या लाभाने लाभान्वित व्हाल. इच्छापूर्ती होईल. कुटुंबातील सर्व सदस्यांचे अपेक्षित सहकार्य मिळत राहील. मनावरील ताण नाहीसा होईल. आरोग्य चांगले राहील. त्यामुळे आत्मविश्वासात वाढ होईल. आपल्या समोरील कामे आपण वेगाने कराल. आर्थिक आवक चांगली राहिल्याने बचतीचे नियोजन नीट केले जाईल. कुटुंब परिवारातील तरुण-तरुणींचे प्रश्न संपुष्टात येतील. नोकरीविषयक केलेले प्रयत्न यशस्वी होतील.
कार्यव्याप्ती वाढेल
कन्या :
आठवड्याच्या सुरुवातीपासूनच आपली कार्यव्याप्ती वाढेल. जास्तीची कामे करावी लागतील. कुटुंबातील तसेच आपल्या कार्यक्षेत्रातील कामे पूर्ण करण्यासाठी जास्त प्रयत्नांची गरज राहील. विशेषतः सरकारी कामे करताना वेळ व खर्च दोन्ही वाढू शकतो. स्वभावात चिडचिडेपणा येईल. एकाचा राग दुसऱ्यावर काढणे चुकीचे ठरेल. संयम ठेवा. सबुरीने घ्या. आपल्या वागण्यावर आणि बोलल्यावर नियंत्रण ठेवणे गरजेचे राहील. काहींना प्रवास करावा लागेल. नोकरीमध्ये काही वेळा मनाविरुद्ध निर्णय स्वीकारावे लागण्याची शक्यता आहे.
मार्गदर्शन लाभेल
तूळ
:
आपण केलेल्या अथवा घेतलेल्या कष्टाला फळ मिळेल. आपल्या धडपडीला या कालखंडात यश मिळेल. एखादे महत्त्वाचे काम जे आत्तापर्यंत पूर्ण होण्यामध्ये अनेक अडचणी निर्माण होत होत्या असे काम पूर्ण करण्यात यश मिळेल. जमीन-जुमला, स्थायी संपत्ती याविषयी रखडलेले व्यवहार गतिशील होतील व पूर्णत्वाकडे वाटचाल करतील. ओळखी, मध्यस्ती उपयोगी पडतील. कुटुंबातील ज्येष्ठांचे मार्गदर्शन लाभेल. विद्यार्थ्यांना आपल्या आवडत्या क्षेत्रात काम करण्याची संधी मिळाल्यामुळे समाधान मिळेल. स्पर्धात्मक यश मिळू शकते. व्यवसाय-धंद्यात चांगली परिस्थिती राहील. जुनी येणी वसूल होतील.
जुनी नाती नव्याने प्रस्थापित होतील                                                           

वृश्चिक : धनलाभाच्या दृष्टीने सप्ताह चांगली फळे देईल. अनेक मार्गांनी धनलाभ होऊ शकतो. विविध प्रकारच्या लाभानी लाभान्वित व्हाल. चालू नोकरीत अपेक्षित घटना घडून पदोन्नती मिळू शकते. लहान-मोठे प्रवास करावे लागतील. जबाबदाऱ्यांमध्ये वृद्धी होण्याची शक्यता. व्यवसाय धंद्यात नवीन नवीन संधी उपलब्ध होतील. व्यवसायिक जुनी येणी वसूल होतील तसेच व्यवसायिक जुनी नाती नव्याने प्रस्थापित होतील. काही फायद्याचे सौदे हाती येतील. कुटुंब परिवारातील तरुण-तरुणींच्या विवाहातील अडचणी दूर होतील. नोकरीविषयक प्रश्न सुटतील. चालू नोकरीत अनुकूल परिस्थिती राहील.

विविध प्रकारचे लाभ
धनु : कुटुंब परिवारातील व आपल्या व्यवसाय धंद्यामध्ये सर्वांचे सहकार्य अपेक्षेप्रमाणे मिळत राहील. आर्थिक परिस्थिती चांगली राहील. विविध प्रकारचे लाभ होतील. कुटुंबात एखाद्या कार्यक्रमाचे नियोजन होऊ शकते. सहकुटुंब सहपरिवार प्रवासाचे नियोजन करावे लागेल. व्यवसाय धंद्यात काही नवीन बदल करता येतील. व्यवसायात केलेले बदल पोषक ठरतील. घरातील कामे व नोकरी यांचा समन्वय साधावा लागेल. कार्याची व्याप्ती वाढल्यामुळे कार्यमग्न राहाल. रखडलेली कामे गतिमान होतील.
विलंबाने कामे होतील
मकर :
आपल्या अवतीभोवती काही सकारात्मक घटना घटित झाल्यामुळे अनुकूलतेमध्ये वाढ होईल. महत्त्वाच्या कामांमध्ये अचानक काही अडचणी उद्भवल्यामुळे काम पूर्ण होण्यास थोडासा अवधी लागेल. विलंबाने कामे होतील.निराश न होता आपल्या कार्यात कार्यमग्न राहा. प्रयत्न कमी पडून देऊ नका. नोकरीविषयक प्रयत्न सफल होतील. पूर्वी दिलेल्या नोकरीविषयक मुलाखती सफल होऊन नोकरीसाठी बोलावणे येईल. विद्यार्थ्यांना कॉलेज कॅम्पसमधून नोकरीसाठी निवड होऊ शकते. तरुण-तरुणींचे अर्थार्जन सुरू होईल. कुटुंब परिवारात आनंददायक वातावरण राहून नातेवाइकांच्या गाठीभेटी होतील. मुलांच्या यशाच्या वार्ता कानी पडतील. काहींचे विवाह ठरतील. परिचयोत्तर विवाह ठरण्याची शक्यता.
वाद-विवाद दुर्लक्षित करा
कुंभ :
आपल्या दैनंदिन कामात अडचणी निर्माण झाल्याने आपल्या स्वभावात चिडखोरपणा येईल. त्यामुळे इतरांवर राग निघण्याची शक्यता, होणारे काम होणार नाही म्हणून आपल्या बोलण्यावर नियंत्रण ठेवणे गरजेचे राहील. कुटुंबातील सदस्यांचे मत शांतपणे ऐकून घ्या. विशेषतः जीवनसाथी बरोबर होणारे वाद-विवाद दुर्लक्षित करा. कुटुंबातील सदस्यांच्या मागण्या वाढण्याची शक्यता आहे. तसेच राहत्या घरासाठी खर्च करावा लागेल. घरातील उपकरणे तसेच वाहने यांच्या देखभालीच्या खर्चामध्ये वाढ होऊ शकते. खर्चाचे प्रमाण वाढल्यासारखे वाटेल. पण खर्च आवश्यक असल्याने ते करावेच लागतील. व्यवसाय धंद्यातील परिस्थिती आशादायक असेल. नवीन योजना सफल होईल. बँकांची कामे होतील.
कष्टाचे चीज होईल                                                                      

मीन :  आपल्या कर्तृत्वाला वाव मिळून कर्तृत्व सिद्ध करण्याच्या संधी मिळतील. नोकरीमध्ये आपल्या कामाचे कौतुक होऊन प्रशंसेस पात्र ठराल. एखादी महत्त्वाची जबाबदारी स्वीकारावी लागण्याची शक्यता. महत्त्वाच्या कामगिरीसाठी आपली निवड होऊ शकते. खेळाडू कलाकार यांना अनुकूल कालावधी. केलेल्या कष्टाचे चीज होईल. प्रसिद्धीबरोबरच अर्थार्जन यामध्ये वाढ होईल. एकूणच आर्थिक आवक चांगली राहिल्यामुळे खर्च करू शकाल. कुटुंबासाठी तसेच स्वतःसाठी नवीन खरेदी होईल. सुशोभीकरणासाठी खर्च होऊ शकतो. व्यवसाय धंद्यात विविध प्रकारचे लाभ होण्याची शक्यता. जुनी येणी वसूल होतील. कायदेशीर कामे पूर्ण होतील. स्वतःच्या प्रकृतीकडे लक्ष ठेवा.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -