Tuesday, May 7, 2024
Homeताज्या घडामोडीCoastal Road : कोस्टल रोड आणि वांद्रे-वरळी सीलिंकदरम्यान महाकाय गर्डरची यशस्वी जोडणी!

Coastal Road : कोस्टल रोड आणि वांद्रे-वरळी सीलिंकदरम्यान महाकाय गर्डरची यशस्वी जोडणी!

अभिमानास्पद कामगिरीबद्दल बीएमसीवर कौतुकाचा वर्षाव

नवी दिल्ली : बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) एक मोठी कामगिरी पार पाडली आहे. महत्त्वाकांक्षी मुंबई कोस्टल रोड (Mumbai Coastal Road) प्रकल्पाने आज पहिली महाकाय तुळई (Bow Arch String Girder) यशस्वीपणे स्थापन केली. आज पहाटे मुंबई कोस्टल रोड आणि वांद्रे-वरळी सागरी सेतू (Bandra-Worli sea link) मार्गाला जोडणारे गर्डर बसवण्यात आले. पहाटे २ वाजेपासून सुरू झालेली ही मोहीम पहाटे ३ वाजून २५ मिनिटांनी यशस्वीपणे पार पडली.

बीएमसीने यासंदर्भातील माहिती सोशल मीडियावर दिली आहे. बीएमसीच्या पोस्टमध्ये म्हटलंय की, या अभियांत्रिकी कामगिरीमुळे महानगरपालिकेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. सदर ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार होण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक श्री. भूषण गगराणी, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अमित सैनी स्वतः प्रकल्प स्थळी उपस्थित होते.

कामगिरीबद्दल उपआयुक्त (विशेष अभियांत्रिकी) श्री. चक्रधर कांडलकर, प्रमुख अभियंता (मुंबई किनारी रस्ता प्रकल्प) श्री. गिरीश निकम यांच्यासह मुंबई किनारी रस्ता प्रकल्पाचे सर्व संबंधित अधिकारी, अभियंता, कर्मचारी यांचे महानगरपालिका आयुक्त श्री. गगराणी, अतिरिक्त आयुक्त डॉ. सैनी यांनी अभिनंदन केल्याचं बीएमसीने ट्वीटमध्ये म्हटलंय.

स्थापन केलेला गर्डर हा वरळीकडून नरिमन पाईंट दिशेला जाणाऱ्या मार्गावर स्थापन करण्यात आला आहे. हा गर्डर दोन हजार मेट्रीक टन वजनाचा असून १३६ मीटर लांब आणि १८ ते २१ मीटर रुंद आहे. लवकरच दुसरा गर्डर देखील स्थापन केला जाणार आहे. त्यानंतर उर्वरित काम पूर्ण करून मुंबई किनारी रस्त्याचा पुढील टप्पा देखील सुरू होईल, अशी माहिती देण्यात आली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -