Monday, May 6, 2024
Homeक्रीडाIPL 2024DC Vs GT: शेवटच्या चेंडूवर दिल्लीचा विजय, अवघ्या ४ धावांनी गुजरातचा पराभव...

DC Vs GT: शेवटच्या चेंडूवर दिल्लीचा विजय, अवघ्या ४ धावांनी गुजरातचा पराभव…

DC Vs GT: ऋषभ पंतने नाबाद ८८ धावांची खेळी केल्याने दिल्ली कॅपिटल्सने गुजरात टायटन्सविरुद्ध ४ बाद २२४ अशी मोठी मजल मारली. पंत त्याच्या उत्कृष्ट खेळात होता आणि त्याने आपल्या अप्रतिम पॉवर हिटिंगच्या सहाय्याने मैदानात  गुजरातच्या गोलंदाजांना चोपले. पॉवरप्लेमध्ये दिल्ली कॅपिटल्सने तीन विकेट गमावल्या, परंतु अक्षर पटेल आणि पंत यांनी ११३ धावांची खेळी दिल्लीला तारले. पंत आणि ट्रिस्टन स्टब्स यांनी स्लॉग ओव्हर्समध्ये डीसी इनिंगला अचूक फायनल पुश दिला आणि त्यामुळे गुजरातसमोर धावांचा डोंगर उभा राहिला.

गुजरातची फलंदाजांनी देखील आक्रमक खेळी करत त्या धावांचा पाठलाग केला, पण धावा जमवण्याच्या नादात गुजरातने विकेट गमावल्या. सातव्या नंबरवर आलेल्या राशीद खानने खेळाच्या शेवटच्या चेंडूपर्यंत जोरदार झुंज दिली पण ती व्यर्थ गेली कारण दिल्ली कॅपिटल्सने येथे ४ धावांनी सामना जिंकला. रशीदने पहिल्या दोन चेंडूंवर दोन चौकार मारले आणि त्यानंतर दोन चेंडु वाया गेले. अफगाणिस्तानच्या स्टार खेळाडू राशीद खानने पाचव्या चेंडूवर षटकार खेचला ज्यामुळे अंतिम चेंडूवर ५ धावा शिल्लक होत्या. त्याने पुन्हा एकदा आपली बॅट जोरात फिरवली पण त्याला षटकार मारण्यात तो अपयशी ठरला. दिल्ली कॅपिटल्सने गुजरात टायटन्सचा फक्त ४ धावांनी पराभव केला.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -