Tuesday, May 7, 2024
Homeताज्या घडामोडीChandrashekhar Bawankule : राहुल गांधींनी औकातीत राहावं!

Chandrashekhar Bawankule : राहुल गांधींनी औकातीत राहावं!

चंद्रशेखर बावनकुळे यांचा जोरदार पलटवार

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) पार्श्वभूमीवर देशात उन्हाच्या पार्‍यासोबतच राजकीय नेत्यांचा पाराही वाढला आहे. सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्यात व्यस्त आहेत. त्यातच काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी सोलापूरमध्ये (Solapur) पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचा एकेरी उल्लेख करत त्यांच्यावर टीका केली. यावर आता भाजपचे प्रधेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी जोरदार पलटवार केला आहे.

चंद्रशेखर बावनकुळे यांनी एक्स अकाऊंटवर पोस्ट करत राहुल गांधींवर निशाणा साधला आहे. त्यात म्हटले आहे की, सोलापुरात येऊन काँग्रेसचे नेते राहुल गांधी मोदीजींबद्दल एकेरी उल्लेख करतात. देशाच्या पंतप्रधानपदी असलेल्या व्यक्तीबद्दल राहुल गांधींची ही भाषा शोभणारी नाही. त्यांनी औकातीत राहावं. लोकसभा निवडणुकीत मोदीजींना मोठ्या प्रमाणात जनसमर्थन मिळत असल्यामुळे राहुल गांधी मोदीजींचा एकेरी उल्लेख करत आहेत. पण जनता मोदीजींच्या पाठीशी आहे.

जनतेने मतदानातून काँग्रेसला धडा शिकवला

पुढे म्हटले आहे की, गाली को गहना बनाना मोदीजी की आदत है. तुम्ही कितीही एकेरी उल्लेख केले, शिव्याशाप दिल्या तरी मोदीजींना पराभूत करू शकत नाही. कधी मौत का सौदागर, तर कधी चोर म्हणून मोदीजींना हिणवलं पण प्रत्येकवेळी जनतेनं मतदानातून काँग्रेसला धडा शिकवला.

राज्यात एकही जागा काँग्रेसला मिळणार नाही

निवडणुकीत पराभवाच्या भीतीनं राहुल गांधींच्या (Rahul Gandhi) पायाखालची वाळू सरकली. त्यामुळे महाराष्ट्रात येऊन मोदीजींचा एकेरी उल्लेख करत आहेत. पण राहुल गांधींनी लक्षात ठेवावं मोदीजींच्या एकेरी उल्लेखानंतर राज्यात एकही जागा काँग्रेसला मिळणार नाही, अशी टीका चंद्रशेखर बावनकुळे यांनी राहुल गांधी यांच्यावर केली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -