Thursday, May 2, 2024
Homeराशिभविष्यसाप्ताहिक राशिभविष्यWeekly Horoscope : साप्ताहिक राशिभविष्य, ३१ मार्च ते ६ एप्रिल २०२४

Weekly Horoscope : साप्ताहिक राशिभविष्य, ३१ मार्च ते ६ एप्रिल २०२४

साप्ताहिक राशिभविष्य, ३१ मार्च ते ६ एप्रिल २०२४

यशाचे वाढते प्रमाण

मेष : आपल्या अवतीभवती अनुकूलता भरलेली अनुभवण्यास मिळेल. अल्प प्रमाणात केलेले कष्ट यशस्वी होतील. काही दीर्घकाळ प्रलंबित असलेली कार्य पूर्ण होतील. सरकारी स्वरूपाच्या कामात यश मिळेल. आपल्या क्षेत्रात इतरांचे सहकार्य मिळाल्यामुळे आपली कामे लवकर पूर्ण होतील. जमीन-जुमला, स्थायी संपत्ती, वडिलोपार्जित संपत्ती इत्यादीविषयक थंडावलेले व्यवहार पुन्हा गतिशील होतील. राहत्या घराविषयीचे काही प्रश्न असतील तर ते सुटतील. आपल्या घरातील भौतिक सुख-सुविधा वाढविण्यासाठी मनसोक्त खर्च कराल. आर्थिक समस्या सुटतील. व्यवसाय धंद्यात अनुकूलता लाभेल. कुटुंब परिवारातील वातावरण आनंदी असेल. व्यवसाय-धंद्यात आपल्या कल्पना यशस्वी होतील. तरुण-तरुणींना नवीन नोकरीच्या संधी प्राप्त होतील. विद्यार्थ्यांनी उज्ज्वल भविष्यासाठी जास्त कष्टाची तयारी ठेवावी.

उपक्रम यशस्वी होतील
वृषभ :
शुभ ग्रहमानाची साथ लाभल्याने सुरुवातीपासूनच आपल्यामध्ये उत्साह व आत्मविश्वास भरलेला असेल. आपल्या समोरील कार्य आपण वेगाने पूर्ण कराल. नवीन कार्य हाती घ्याल. जमीन-जुमला, स्थायी संपत्ती यांविषयीची कामे लवकर पूर्ण होतील. अपेक्षेपेक्षा कार्य लवकर होतील. या कामी आपल्याला कुटुंबातील सदस्यांचे तसेच मित्रमंडळींकडून सहकार्य लाभेल. विद्यार्थ्यांना आपल्या अभ्यासाकडे लक्ष केंद्रित करणे गरजेचे राहील. आर्थिक स्तर उंचावेल. मात्र खर्चाच्या प्रमाणात वाढवण्यास मिळू शकते. व्यवसायात तसेच नोकरीमध्ये आपल्या कार्यक्षेत्रात हाती घेतलेली उपक्रम यशस्वी झाल्यामुळे समाधान मिळेल.
सहकार्य लाभेल
मिथुन :
सदरचा कालावधी अनुकूल ठरेल. स्वतःच्या व्यक्तिमत्त्वाचा व कार्याचा प्रभाव इतरांवर पडेल. आपली महत्त्वाची कार्य शिग्रतेने पूर्ण होतील. व्यापार व्यवसायात घेतलेले निर्णय योग्य ठरतील. व्यवसायात नवीन संधी उपलब्ध होऊ शकतात. नवीन व्यवसाय सुद्धा सुरू करू शकाल. सरकार दरबारची कामे इतरांचे सहकार्य लाभल्यामुळे पूर्ण करू शकाल. व्यवसायातही कामगार वर्गाचे सहकार्य मिळू शकते. सरकारी स्वरूपाच्या नोकरीत आपली कार्य व्याप्ती वाढेल. नवीन कार्यभार सोपविला जाऊ शकतो; परंतु अधिकाऱ्याच्या मर्यादित राहूनच आपली कार्य आपण पूर्ण करावी. नियम व अटी पाळणे हितकारक ठरेल. कुटुंबातून तसेच बाहेरून सर्वांचे सहकार्य मिळाल्यामुळे आपण उत्साहाने नवीन जबाबदाऱ्या स्वीकारू शकाल.
कायदेशीर प्रकरणातून लाभ
कर्क :
काही वेळेस चांगले लाभ होऊ शकतात. बरेच दिवस आपल्या मनात असलेली एखादी इच्छा अचानकरीत्या पूर्ण झाल्यामुळे आनंदित राहाल. कुटुंब परिवारात सुखदेव वाढता येतील. कुटुंब परिवारातील तरुण-तरुणांच्या समस्या संपुष्टात येतील. नवीन नोकरी मिळवण्यासाठी केलेले प्रयत्न यशस्वी होतील. व्यवसाय, धंद्यातील तसेच नोकरीतील कामाच्या निमित्ताने लहान-मोठे प्रवास करावे लागतील. आपल्या क्षमतेतील कामे स्वीकारण्याकडे लक्ष ठेवा. अति आत्मविश्वासाबरोबर जास्त धोका पत्करू नका. कोर्ट कचेरीतील प्रलंबित असलेली कामे मार्गी लागतील. विद्यार्थ्यांनी इतरत्र वेळ वाया घालवू नये तसेच अभ्यासाकडे लक्ष द्यावे.
प्रश्न सुटतील
सिंह :
कुटुंब परिवार तसेच आपल्या कार्यक्षेत्रातील प्रलंबित असलेल्या समस्या अथवा प्रश्न या कालावधीमध्ये सुटतील. विशेषतः भूमिभुवन वडिलोपार्जित संपत्ती जमिनीविषयी असलेले वाद संपुष्टात येऊन आपल्या बाजूने निर्णय होण्याची शक्यता आहे. व्यापार व्यवसायिकांसाठी अनुकूल कालावधी आहे. प्रगती व उन्नती करू शकाल. आर्थिक प्राप्ती जास्त होईल. नोकरीमध्ये उत्साह आणि आत्मविश्वास वाढवणाऱ्या घटना घडतील. परिणामतः पदोन्नती आणि वेतनवृद्धी होईल. काहींना परदेशी जाऊन कार्य करण्याची संधी उपलब्ध होईल. वास्तुविषयक समस्या सुटतील.
भावनांवर नियंत्रण ठेवा
कन्या :
सुरुवातीच्या कालावधीत सावधानता बाळगणे गरजेचे राहील. काही घटना मनाविरुद्ध घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. आजूबाजूच्या परिस्थितीमुळे त्रास होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मानसिक त्रास व मनस्ताप होण्याची शक्यता दिसते. तसेच परिवारातील जबाबदाऱ्या वाढतील. काही वेळा चिंता सतावेल. शांत राहून पूर्ण विचारांती निर्णय घेतल्यास समस्येचे निराकरण होऊ शकते. आपल्या आरोग्याकडे लक्ष देणे हितावह ठरेल. काही वेळेस भावना अनावर होण्याची शक्यता आहे. आपल्या भावनांवर व बोलण्यावर नियंत्रण ठेवणे गरजेचे राहील.
उत्तम प्रतिसाद मिळेल
तूळ
:
काही वेळेस आपल्याला नवीन जबाबदाऱ्यांना तोंड द्यावे लागेल. केलेले नियोजन बदलावे लागेल. आपल्या कुटुंबातून व आपल्या कार्यक्षेत्रातून कोंडी झाल्याचे जाणू शकते. काही वेळेस कामांमध्ये अचानक समस्या, अडचणी उद्भवू शकतात. तसेच नोकरीत अधिक काम करावे लागेल. सरकारी स्वरूपाच्या नोकरीत अतिरिक्त कार्यभार सोपविला जाण्याची शक्यता आहे. आपली कार्य आपल्या अधिकारांच्या कार्य कक्षेत पूर्ण करणे महत्त्वाचे ठरेल. माहीत नसलेल्या प्रकरणात हस्तक्षेप करू नका. पूर्ण माहिती घेणे जरुरीचे ठरेल. आपल्या कार्यक्षेत्रात उत्साह व धैर्य वाढेल. आर्थिक व्याप्ती वाढेल.
वैयक्तिक प्रगती-उन्नती                                                                 वृश्चिक : या कालावधीमध्ये आपली वैयक्तिक प्रगती तथा उन्नती होऊ शकते. आपल्या कार्यक्षेत्रात आपण प्रगती करू शकाल. काही वेगवान घटना घठीत होण्याचा संभव आहे. त्याचबरोबर आपल्या कर्तृत्वाला वाव मिळणार आहे. आपले कर्तृत्व सिद्ध करण्याच्या संधी चालून येतील. आपल्या अर्थार्जनामध्ये वृद्धी होईल. नोकरीच्या ठिकाणी नोकरदारांना अनुकूल कालावधी अनुभवण्यास मिळू शकतो. उत्साह व आत्मविश्वासात वाढ झाल्याने सकारात्मकता वाढेल. नव्या गुंतवणुका करताना त्या त्या क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन आवश्यक. विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची द्वारे प्रशस्त होतील.
मतभेद संपुष्टात येतील
धनु : कुटुंब परिवारात तसेच भावंडांमधील प्रेम दिसून येईल. कुटुंबात, कार्यक्षेत्रात असलेले मतभेद अथवा वादविवाद संपुष्टात येतील. एकमेकांमधील सामंजस्य वाढीस लागेल. समाधानी वातावरणाचा लाभ नोकरीत अनुकूल वातावरण मिळू शकेल. अपेक्षित घटना घटित होतील. विशेषतः सरकारी स्वरूपाच्या नोकरीमध्ये उच्चपद मिळून पदोन्नती अथवा वेतनवृद्धी मिळू शकते. वरिष्ठांचे तसेच सहकाऱ्यांचे सहकार्य लाभेल. पूर्वीच्या कालावधीमध्ये आपले मतभेद होते अशा व्यक्तींबरोबर मतभेद संपुष्टात येतील. आर्थिक परिस्थिती चांगली राहिल्याने मनसोक्त खर्च कराल.
कार्यक्षेत्रातून शुभ समाचार
मकर :
आपल्या नोकरी-व्यवसाय धंद्यात तसेच आपल्या कार्यक्षेत्रात निरनिराळ्या कारणांसाठी लहान-मोठे प्रवास करण्याची शक्यता आहे. या प्रवासामधील अधिकांश प्रवास सफल होतील व आपल्या प्रगती व उन्नतीचे कारण ठरतील. नवीन ओळखी होऊन नव्याने व्यावसायिक संबंध प्रस्थापित होऊ शकतील. आर्थिक स्तर उंचावेल. नोकरीमध्ये काही नवीन जबाबदाऱ्या स्वीकाराव्या लागतील. कामाच्या स्वरूपात बदल घडू शकतो. आपली कार्य सुनियोजित पद्धतीने केल्यास सफलता मिळेल. कोणताही निर्णय घेताना तो शांतपणे व पूर्ण विचाराने घेणे सोयीस्कर ठरेल. विद्यार्थ्यांना आपल्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करणे महत्त्वाचे ठरेल तसेच आरोग्याविषयी सतर्क राहा.
अचानक धनलाभ
कुंभ :
आपल्याला अचानक धनलाभाची शक्यता आहे. तसेच गुप्तधनाची प्राप्ती संभव आहे. आपली आर्थिक परिस्थिती अधिक मजबूत होईल. या कालावधीमध्ये निरनिराळ्या लाभांनी लाभान्वित्त होता येईल. रखडलेली अथवा रेंगाळलेली मालमत्तेसंबंधी तसेच जमीन वडिलोपार्जित संपत्ती इत्यादी विषयीची कामे मार्गी लागू शकतील. आई-वडिलांची मदत व मार्गदर्शन मिळेल. त्यातून धनलाभ होऊ शकतो. आर्थिक स्तर उंचावेल. कुटुंबातील सदस्यांच्या वाढत्या मागण्या पूर्ण करू शकाल. कृतकृत्य झाल्याचे समाधान मिळेल. कुटुंबातील विवाहयोग्य तरुण-तरुणींचे विवाह ठरतील. व्यवसाय धंद्यातील परिस्थिती समाधानकारक राहील. कर्ज घेतले असल्यास त्याची परतफेड करू शकाल.
स्पर्धात्मक यश                                                                             मीन :  अनुकूल कालावधी. विशेषत: विद्यार्थी-विद्यार्थिनींना सदरचा कालावधी अनुकूल राहील. जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करत असतील तसेच इतिहास, भूगोल, कायद्याचा अभ्यास करत असतील तर त्यांना त्यांच्या क्षेत्रात नवीन संधी प्राप्त होतील. स्पर्धात्मक यश संभवते. ज्या विद्यार्थ्यांना परदेशी जाऊन उच्चशिक्षण घ्यावयाचे आहे अशा विद्यार्थ्यांचे स्वप्न साकार होऊन परदेशी जाऊ शकाल. या कामी आपल्या गुरूंची तसेच कुटुंबांची मदत मिळू शकेल. मार्गदर्शन मिळेल. परदेशी जाण्याचे नियोजन सफल होईल; परंतु प्रयत्न मात्र प्रामाणिकपणे हवेत. आळस झटका, अधिक परिश्रम, कष्ट, मेहनत घेण्याची तयारी ठेवावी लागेल. कुटुंबात लहान-मोठ्या समस्यांचा प्रादुर्भाव होऊ शकतो.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -