Friday, May 10, 2024
Homeताज्या घडामोडीMumbai Water supply : मुंबईच्या तीन विभागांत १७ जानेवारीला पाणीपुरवठा बंद!

Mumbai Water supply : मुंबईच्या तीन विभागांत १७ जानेवारीला पाणीपुरवठा बंद!

जाणून घ्या तुमच्या परिसरात पाणी येणार की नाही…

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) ‘ई’ विभागातील पाणीपुरवठा (Mumbai Water supply) सुव्यवस्थित करण्याकरिता नव्या जलवाहिनीचे काम करण्यात येणार आहे. त्यासाठी मुंबईच्या ए, बी आणि ई विभागातील काही परिसरात १७ जानेवारी रोजी सकाळी १० ते दिनांक १८ जानेवारी रोजी सकाळी १० वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद करण्यात येणार आहे. तर या काळात जे. जे. रुग्णालय परिसरात कमी दाबाने पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी काटकसरीने पाणी वापरावे असं आवाहन महापालिकेने केलं आहे.

नवानगर, डॉकयार्ड रोड येथे असलेली जुनी १२०० मि.मी. व्यासाची जलवाहिनी बंद करुन सदर ठिकाणी नवीन १२०० मि.मी. व्यासाची जलवाहिनी कार्यान्वित करण्यात येणार आहे. त्यासाठी भंडारवाडा जलाशयाला जाणाऱ्या जुन्या १२०० मि.मी. च्या जलवाहिनीवर जलद्वार बसविण्याचे काम बुधवार १७ जानेवारी रोजी सकाळी १० वाजेपासून ते गुरुवार, १८ जानेवारी रोजी सकाळी १० वाजेपर्यंत एकूण २४ तासांसाठी हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे ए, बी आणि ई विभागातील काही परिसरात पाणीपुरवठा २४ तास बंद राहणार आहे. तर जे. जे. रुग्णालय परिसरात कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे.

सदर तपशील मुंबई महापालिकेने एक निवेदन प्रसिद्ध करून दिलं असून तो खालीलप्रमाणे आहे,

ए विभाग :

सेंट जॉर्ज हॉस्पिटल, पी. डिमेलो रोड, रामगड झोपडपट्टी, आर. बी आय., नेव्हल डॉकयार्ड, शहीद भगतसिंग मार्ग, जी. पी. ओ. जंक्शनपासून रिगल सिनेमा या सर्व ठिकाणी पाणीपुरवठा पूर्णतः बंद.

ई विभाग :

नेसबीट झोन, म्हातारपाखाडी रोड, डॉकयार्ड रोड झोन, हातीबाग मार्ग, जे. जे. रुग्णालय, मुंबई पोर्ट ट्रस्ट झोन, रे रोड झोन, माऊंट या सर्व ठिकाणी पाणीपुरवठा पूर्णतः बंद.

बी विभाग :

बाबूला टँक झोन, डोंगरी बी झोन, डोंगरी ‘ए’ झोन, मुंबई पोर्ट ट्रस्ट झोन, मध्य रेल्वे – रेल्वे यार्ड, वाडी बंदर, आझाद मैदान बुस्टींग या सर्व ठिकाणी पाणीपुरवठा पूर्णतः बंद.

संबंधित परिसरातील नागरिकांना पाण्याचा पुरेसा साठा करुन ठेवावा आणि दिनांक १७ व १८ जानेवारी २०२४ रोजी पाणी जपून वापरावे व बृहन्मुंबई महानगरपालिकेस सहकार्य करावे, असं आवाहन करण्यात आलं आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -