Wednesday, June 26, 2024
Homeताज्या घडामोडीरक्ताच्या नुमना अहवालात फेरफार केल्याने दोन डॉक्टरांना अटक

रक्ताच्या नुमना अहवालात फेरफार केल्याने दोन डॉक्टरांना अटक

पुण्यातील अपघातप्रकरणी पोलीस आयुक्तांनी दिली माहिती

पुणे : पुणे शहर गुन्हे शाखेने सोमवारी सकाळी ससून रुग्णालयातील डॉ. अजय तावरे आणि डॉ. श्रीहरी हलनोर या दोघा डॉक्टरांना कल्याणीनगर अपघात प्रकरणातील अल्पवयीन मुलाच्या रक्ताच्या नमुन्यात फेरफार केल्याप्रकरणी अटक केली.

पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार म्हणाले, आम्ही तावरे आणि हलनोर यांना रक्ताचे नमुने बदलून रक्ताच्या नमुन्याच्या अहवालात फेरफार केल्याप्रकरणी अटक केली आहे. आम्ही हॉस्पिटलमधील संपूर्ण प्रक्रियेचा अभ्यास केला आणि हेराफेरी लक्षात आली. त्यानंतर आमच्या टीमने दोन डॉक्टरांना अटक करण्याचा निर्णय घेतला. दोघेही हॉस्पिटलच्या फॉरेन्सिक विभागात नेमणुकीस आहेत.

अपघातानंतर मेडिकल टेस्टसाठी त्या अल्पवयीन मुलाला आणले असता सँपल बदलण्यात आले. पुणे पोलिसांनी इतर लँबमध्ये या मुलाचे डीएनए टेस्टिंग केल्यावर ही माहिती समोर आली आहे. एवढेच नाही तर धनिकपुत्राचे रक्ताचे नमुने घेऊन ते कचऱ्याच्या डब्यात फेकून दिल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पुण्याचे पोलीस आयुक्त अमितशे कुमार यांनी ही माहिती दिली आहे.

ससूनसह खासगी रुग्णालयातही रक्त नमुन्याची तपासणी

अल्पवयीन मुलाने भरधाव वेगाने वाहन चालवून केलेल्या अपघातात दोन जणांना जीव गमवावा लागला. या अल्पवयीन बाळाने नुकतीच बारावीची परीक्षा दिली होती. मित्रांबरोबर तो रविवारी रात्री पार्टी करण्यासाठी गेला होता. पार्टीला जाताना त्याने वडिलांकडून पोर्शे ही महागडी कार घेतली होती. मुलगा मद्यप्राशन करतो, याची माहिती बांधकाम व्यावसायिक वडिलांना होती. अल्पवयीन मुलगा व त्याच्या मित्रांनी हॉटेल कोझी आणि हॉटेल ब्लॅकमध्ये मद्य प्राशन केले. तेथे त्यांनी जेवण केले. दोन तासांत मुलाने मद्यपार्टीवर ४८ हजार रुपये खर्च केले. पोलिसांनी दोन्ही हॉटेलमधील चित्रीकरण तपासले. तेव्हा मुलगा आणि त्याचे मित्र मद्यप्राशन करीत असल्याचे दिसून आले आहे. हॉटेलमधील बिल मुलाने ऑनलाइन दिल्याचे उघडकीस आले आहे. पोलिसांनी ऑनलाइन बिल अदा केल्याच्या नोंदी तपासासाठी ताब्यात घेतल्या आहेत. पोलिसांनी मुलाच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी ससून तसेच खासगी रुग्णालयात पाठविले होते.

मी शांत बसणार नाही, सगळ्यांची नावे घेणार

आरोपी डॉ. अजय तावरे आणि डॉ. श्रीहरी हाळनूर यांची सखोल चौकशी सुरू करण्यात आली आहे. यातील डॉ. अजय तावरे याने पोलिसांना कारवाई दरम्यान ‘मी शांत बसणार नाही. मी सगळ्यांची नावे घेणार.’ असा इशारा दिला आहे. तावरे याने दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी अतुल घटकांबळे नावाच्या मध्यस्थाला अटक केली असून त्यानेच या डॉक्टरांना पैसे पुरवल्याचे समोर आले आहे. या प्रकरणात एका लोकप्रतिनिधीचे नाव देखील त्याने घेतले असून त्याविषयी तपास सुरू करण्यात आला आहे. ससून रुग्णालयामधील डॉक्टरांच्या घशात नोटांची बंडले कोंबून थेट रक्त नमुनेच बदलण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे. आरोपी मुलाचे वडील विशाल अगरवाल याने डॉ. अजय तावरे यांच्याशी यासंदर्भात संपर्क साधलेला होता. त्यावेळी फोनवरुन एका लोकप्रतिनिधीने डॉ. तावरे यांना आरोपी मुलाला मदत करण्याबाबत सांगितल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -