Friday, May 10, 2024
Homeताज्या घडामोडीराज्यातील नगरपंचायतीच्या निवडणुका जाहीर; १८ ऑगस्टला मतदान

राज्यातील नगरपंचायतीच्या निवडणुका जाहीर; १८ ऑगस्टला मतदान

मुंबई : राज्यातील नगरपालिकांच्या निवडणुकांचा आज अखेर बिगुल वाजला. १८ ऑगस्ट रोजी मतदान होणार असून या निवडणूकीची प्रक्रीया २० जुलैपासून सुरु होणार आहे. निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार २० जून रोजी जिल्हाधिकारी निवडणूक कार्यक्रम जाहिर करणार असून लगेच २२ ते २८ जुलैपर्यंत राज्य निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या संकेतस्थळावर नामनिर्देशनपत्र भरायची आहेत. १७ जिल्ह्यातील ९२ नगरपालिका व चार नगरपंचायतींच्या निवडणुकींचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने आज जाहिर केला.

पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर, औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद, लातूर, अमरावती आणि बुलढाणा या १७ जिल्ह्यातील ९२ नगर परिषदा आणि चार नगरपंचायतीमध्ये निवडणुका होणार आहे. छाननी व वैध नामनिर्देशन पत्र असलेल्या उमेदवारांची यादी २९ जुलै रोजी जाहिर केली जाणार असून ४ ऑगस्ट पर्यंत अर्ज माघारी घेता येणार आहेत. उमेदवारी मागे घेण्यासाठीच्या शेवटच्या दिवसानंतरच्या लगतच्या दिवशी अंतिम यादी प्रसिध्द केली जाणार आहे.

दरम्यान सत्ताबदलानंतर नगराध्यक्ष जनतेतून निवडावा अशी भाजपची भूमिका असल्याने राज्य शासन त्या बाबत काय निर्णय घेणार या बाबतही उत्सुकता आहे. मात्र आता निवडणूक आयोगाने हा कार्यक्रम जाहिर केल्याने नगरपालिकांच्या निवडणकांचा बिगुल वाजला आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -