Saturday, April 27, 2024
Homeताज्या घडामोडीलखीची बंधु भेट : संतांच्या पालख्यांचे पंढरपूर तालुक्यात प्रवेश

लखीची बंधु भेट : संतांच्या पालख्यांचे पंढरपूर तालुक्यात प्रवेश

सोलापूर (हिं.स.) : लखी सोहळ्यामध्ये वेगवेगळ्या मार्गावर चालत असणाऱ्या बंधूंची भेट पंढरपूर नजीक आल्यावर होत असते तालुक्यामध्ये संत ज्ञानदेव व संत सोपान देव यांची बंधू भेट झाल्यानंतर संत ज्ञानदेव पुढील मार्गक्रमण करण्यासाठी पुढे निघतात. त्यानंतर संत सोपानदेव महाराज व संत तुकाराम महाराज यांची बंधू भेट होत असते याही वर्षी ही बंधू भेट मोठ्या उत्साहात व आनंदात संपन्न झाली पालखी मार्गाच्या सुरू असलेल्या कामामुळे ही बंधू भेट यावर्षी दसर पाटी या ठिकाणी संपन्न झाली.

आषाढ शु. अष्टमीला तोंडले येथून सोहळा निघाल्यावर वाटेत सोपानकाकांच्या पालखीची व माउलींच्या पालखीची बंधु भेट माळशिरस तालुक्याच्या हद्दीत झाली. दुपारच्या भोजनानंतर टप्पा येथे माउलींचा पालखी सोहळा विसावतो. याच वेळेस सोपानकाकाकांचा पालखी सोहळा शेजारून पुढे जातो. सोपानकाकांचा रथ माउलींच्या रथा शेजारी आल्यावर थोडा वेळ थांबतो. यावेळी दोन्ही संस्थानकडून परस्परांना नारळ प्रसाद दिला जातो. तत्पुर्वी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे ठाकूर बुवा समाधी येथे नेत्रदीपक गोल रिंगण संपन्न झाले.

माउलीची पालखी वेळापूर येथून प्रस्थान झाल्यानंतर ठाकूर बुवा समाधी या ठिकाणी पालखी पोहचली. या ठिकाणी संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचा माउली माउली, टाळ मृदुंग च्या जयघोष करीत रिंगण सोहळा पार पडला रिंगण सोहळा पार पडल्यानंतर पालखी पुढे मार्गस्थ झाली. काही वेळातच माळशिरस तालुक्याच्या हद्दीत जेष्ठ बंधू सोपानदेव महाराज व संत ज्ञानेश्वर महाराज पालखीची भेट झाली. या दोन पालख्या एकमेकान भेटल्या. या वेळी उपस्थित भाविकांनी विठ्ठल विठ्ठलचा जयघोष केला.

माउलीच्या पालखी विश्वस्तांनी सोपानदेव यांच्या मानकरी याना मानाचा नारळ प्रसाद दिला. बंधू भेटीचा भावपूर्ण सोहळा पाहून भाविक सुखावले. पुढे माउलीची पालखी भंडीशेगाव येथे मुक्कामी पोहचली. जगद्गुरू संत तुकारम महाराज यांच्या पालखीने बोरगाव पालखी मार्गस्थ होत तोंडले बोंडले या ठिकाणी पोहचली. या ठिकाणी पालखीतील सर्व भाविक धावले. तुका म्हणे धावा … आहे पंढरीस विसावा या अभंगाप्रमाणे भाविकांनी धावा केला. आणि पालखी पिराची कुरोली येथे मुक्कमी पोहोचली.

यावेळी संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज, पंढपूर तालुक्यात आगमण झाले. या पालख्यांचे पंढरपूर तालुका प्रशासनाच्या वतीने गटविकास अधिकारी प्रशांत काळे व तालुका आरोग्य अधिकारी डॉ.एकनाथ बोधले यांनी स्वागत केले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -