Monday, May 27, 2024
Homeक्रीडाशंकर गदई, स्नेहल शिंदे यांच्याकडे महाराष्ट्राच्या कबड्डी संघाचे नेतृत्व

शंकर गदई, स्नेहल शिंदे यांच्याकडे महाराष्ट्राच्या कबड्डी संघाचे नेतृत्व

३६ व्या राष्ट्रीय खेळ स्पर्धेकरिता पुरुष-महिला संघ जाहीर

मुंबई (वार्ताहर) : कंकारिया, अहमदाबाद, गुजरात येथे होणाऱ्या “३६व्या राष्ट्रीय खेळ” स्पर्धेकरिता महाराष्ट्र राज्य कबड्डी असो.ने आपले पुरुष व महिला संघ जाहीर केले. अहमदनगरच्या शंकर गदईकडे पुन्हा एकदा पुरुष, तर पुण्याच्या स्नेहल शिंदेकडे महिला गटाच्या नेतृत्वाची धुरा सोपविण्यात आली. काही दिवसांच्या सरावानंतर हे अंतिम संघ जाहीर करण्यात आले. भारतीय ऑलम्पिक व गुजरात ऑलम्पिक संघटनेच्या संयुक्त विद्यमाने व गुजरात राज्य शासनाच्या सहकार्याने या स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे.

ईका इरिना ट्रान्स बंदिस्त क्रीडा संकुल येथे दि. २६ सप्टेंबर ते ०१ ऑक्टोबर २०२२ या कालावधीत या स्पर्धा खेळविण्यात येतील. सध्या हे दोन्ही संघ “छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल, म्हाळुंगे, बालेवाडी, पुणे येथील बंदिस्त संकुलातील मॅटवर सराव करीत आहेत. महाराष्ट्र राज्य कबड्डी असो.चे सरचिटणीस आस्वाद पाटील यांनी मंगळवारी हे संघ जाहीर केले.

पुरुष संघ : १) शंकर गदई (संघनायक) – अहमदनगर, २) मयूर कदम – रायगड, ३) असलम इनामदार – ठाणे, ४) आकाश शिंदे – नाशिक, ५) किरण मगर – नांदेड, ६) अरकम शेख – मुंबई उपनगर, ७) पंकज मोहिते – मुंबई शहर, ८) राहुल खाटीक – अहमदनगर, ९) अक्षय भोईर – ठाणे, १०) सिद्धेश पिंगळे – मुंबई शहर, ११) अजिंक्य सुनील पवार – रत्नागिरी, १२) सचिन पाटील – पुणे, प्रशिक्षक : प्रशांत चव्हाण, व्यवस्थापक : आयुबखान पठाण, फिटनेस ट्रेनर : पुरुषोत्तम प्रभू.

महिला संघ : १) स्नेहल शिंदे (संघनायिका) – पुणे, २) सोनाली शिंगटे – मुंबई शहर, ३) रेखा सावंत – मुंबई शहर, ४) पूजा शेलार – पुणे, ५)अंकिता जगताप – पुणे, ६) पूजा यादव – मुंबई शहर, ७) सायली जाधव – मुंबई उपनगर, ८) सायली केरीपाळे – पुणे, ९) सोनाली हेळवी – सातारा, १०) निकिता लंगोट – परभणी, ११) मेघा कदम – मुंबई शहर, १२) रक्षा नारकर – मुंबई शहर, प्रशिक्षक : संजय मोकल, व्यवस्थापिका: मेघाली कोरगावकर-म्हसकर, फिटनेस ट्रेनर: वंदना कोरडे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -