Monday, June 17, 2024
Homeक्रीडाIPL 2024IPL 2024: खिताब जिंकणाऱ्या संघावर होणार पैशांचा पाऊस, पाहा किती मिळणार रक्कम

IPL 2024: खिताब जिंकणाऱ्या संघावर होणार पैशांचा पाऊस, पाहा किती मिळणार रक्कम

मुंबई: आयपीएल २०२४चा फायनल सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यात खेळवला जात आहे. दोघांमध्ये ही लढत चेन्नईच्या एमए चिदम्बरम स्टेडियममध्ये होत आहे. या मैदानावर आयपीएलचा खिताब जिंकणारा संघ आज मालामाल होऊन घरी परतेल. ट्रॉफी आपल्या नावे करणाऱ्या संघाला बक्षीस म्हणून तगडी रक्कम मिळणार आहे. जाणून घेऊया किती मिळेल बक्षिसाची रक्कम…

ट्रॉफीसोबत मिळणार कोट्यावधी रूपये

कोलकाता अथवा हैदारबादपैकी जो संघ खिताब जिंकेल त्याला चमचमत्या ट्रॉफीसह बक्षीस म्हणून २० कोटी रूपये दिले जाणार आहे. आयपीएलमधील विजेता संघाला मिळणारी रक्कम ही जगात खेळवल्या दजाणाऱ्या कोणत्याही टी-२० लीगपेक्षा अधिक असते. गेल्या हंगामात आयपीएल २०२३मध्येही बक्षीस म्हणून २० कोटी रूपये देण्यात आले होते.

रनरअप संघही होणार मालमाल

आयपीएलचा खिताब जिंकणाऱ्या संघासोबत फायनलमध्ये हरणाऱ्या रनरअप संघावरही पैशांचा पाऊस होणार आहे. खिताबी सामना गमावणाऱ्या संघाला १२.५ कोटी रूपये मिळतील.

तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावरील संघालाही मिळणार कोट्यावधी

आयपीएल स्पर्धेत तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावरील संघांनाही बक्षिसाची रक्कम मिळणार आहे. राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू हे संघ अनुक्रमे तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावर आहेत. दोन्ही संघांना ७-७ कोटी रूपये मिळतील.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -