Monday, June 17, 2024
Homeताज्या घडामोडीPune Porsche Accident : डॉ. तावरे सगळ्यांची म्हणजे कोणाकोणाची नावे घेणार?

Pune Porsche Accident : डॉ. तावरे सगळ्यांची म्हणजे कोणाकोणाची नावे घेणार?

पुणे : कल्याणीनगर अपघातामधील (Pune Porsche Accident case) अल्पवयीन मुलाला वाचवण्यासाठी रक्त नमुने बदलल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपी डॉ. अजय तावरे आणि डॉ. श्रीहरी हाळनूर यांची कसून चौकशी सुरू आहे. यातील डॉ. अजय तावरे याने पोलिसांना कारवाई दरम्यान ‘मी शांत बसणार नाही. मी सगळ्यांची नावे घेणार’ असा इशारा दिला आहे. त्यामुळे डॉ. तावरे कोणाकोणाची नावे घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

त्याने दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी अतुल घटकांबळे नावाच्या मध्यस्थाला अटक केली असून त्यानेच या डॉक्टरांना पैसे पुरवल्याचे समोर आले आहे. या प्रकरणात एका लोकप्रतिनिधीचे नाव देखील त्याने घेतले असून त्याविषयी तपास सुरू करण्यात आला आहे.

कल्याणीनगर अपघातामधील अल्पवयीन आरोपीला वाचविण्यासाठी अनेक प्रकारचे प्रयत्न झाल्याचे समोर आले आहे. सुरुवातीला पोलीस ठाण्यात जाऊन पोलीस आणि प्रत्यक्षदर्शीना ‘मॅनेज’ करण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यानंतर, ससून रुग्णालयामधील डॉक्टरांच्या घशात नोटांची बंडले कोंबून थेट रक्त नमुनेच बदलण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे. आरोपी मुलाचे वडील विशाल अगरवाल याने डॉ. अजय तावरे यांच्याशी यासंदर्भात संपर्क साधला होता.

त्यावेळी फोनवरुन एका लोकप्रतिनिधीने डॉ. तावरे यांना आरोपी मुलाला मदत करण्याबाबत सांगितल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. हा लोकप्रतिनिधी कोण, याबाबतही जोरदार चर्चा सुरु आहे. पोलिसांना याबाबत खात्रीलायक माहिती मिळाली असली तरी नाव सांगण्यास पोलीस हात आखडता घेत आहेत.

अपघात प्रकरणामधील अल्पवयीन आरोपीची ससून रुग्णालयात वैद्यकीय चाचणी करण्यात आली होती. ससूनच्या फॉरेन्सिक विभागाचे प्रमुख डॉ. अजय तावरे आणि मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीहरी हाळनोर या दोघांनी मिळून अल्पवयीन आरोपीचे रक्त नमुने कचऱ्याच्या डब्यात फेकून दिले होते. त्याऐवजी भलत्याच व्यक्तीच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले.

याप्रकरणी दोघांवर भादवि १२० ब, ४६७, २०१, २१२, २१३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कटात सहभागी असणे, बनावट कागदपत्र तयार करणे, पुरावा नष्ट करण्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. त्यांना अटक देखील करण्यात आली आहे. आता याप्रकरणी आणखी कोण सापडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -