Monday, June 17, 2024
Homeक्रीडाIPL 2024IPL 2024: कोलकाता बनली चॅम्पियन, फायनलमध्ये हैदराबादला हरवत मिळवला खिताब

IPL 2024: कोलकाता बनली चॅम्पियन, फायनलमध्ये हैदराबादला हरवत मिळवला खिताब

मुंबई: कोलकाता नाईट रायडर्सने(kolkata knight riders) सनरायजर्स हैदराबादला(sunrisers hyderabad) ८ विकेटनी हरवत तिसऱ्यांदा आयपीएल चॅम्पियनचा खिताब मिळवला. सनरायजर्स हैदराबादने पहिल्यांदा खेळताना केवळ ११३ धावा केल्या. सुनील नरेन नेहमीप्रमाणे हैदराबादविरुद्ध चांगली कामगिरी करू शकला नाही. मात्र केकेआरच्या इतर फलंदाजांनी जबरदस्त फलंदाजी करताना ११व्या ओव्हरमध्ये हैदराबादने दिलेले लक्ष्य पूर्ण केले.

फलंदाजीत वेंकटेश अय्यर कोलकाताच्या विजयाचा हिरो ठरला. त्याने २६ बॉलमध्ये ५२ धावांची खेळी केली. याआधी आंद्रे रसेलने ३ विकेट आणि मिचेल स्टार्कने २ विकेट मिळवत केकेआरला तिसऱ्यांदा ट्रॉफी मिळवून देण्यात महत्त्वाचे योगदान दिले. चेपॉक स्टेडियममध्ये रंगलेल्या या सामन्यात सनरायजर्स हैदराबाद आयपीएलच्या एखाद्या फायनलमध्ये पहिल्यांदा खेळून सर्वात छोटा स्कोर बनवणारा संघ ठरला.

११४ धावांचे छोटे लक्ष्य घेऊन उतरलेल्या केकेआरची सुरूवात चांगली झाली नाही. कारण सुनील नरेनने आपल्या पहिल्या बॉलवर षटकार ठोकल्यानंतर दुसऱ्याच बॉलवर तो बाद झाला. नरेनची बॅट पुन्हा एकदा हैदराबादविरुद्ध चालली नाही.

दुसरीकडे वेंकटेश अय्यरने मात्र तुफानी अंदाजात बॅटिंग केली. गुरबाज आणि अय्यरच्या जोडीने पावरप्लेमधील टीमचा स्कोर एक बाद ७२वर नेऊन ठेवला. सलग चौकार आणि षटकारांचा पाऊस पडत होता. तर हैदराबादचे बॉलर्स पूर्णपणे निराश झालेले दिसत होते. ९व्या ओव्हरमध्ये गुरबाज ३२ बॉलमध्ये ३९ धावा बनवून बाद झाला. मात्र स्कोरबोर्डवर इतका स्कोर झाला होता की केकेआरचा विजय निश्चित झाला होता.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -