Monday, June 17, 2024
Homeदेशझाडू पार्टी ड्रग्सची होलसेलर! पंतप्रधान मोदी यांचा 'आप' वर निशाणा

झाडू पार्टी ड्रग्सची होलसेलर! पंतप्रधान मोदी यांचा ‘आप’ वर निशाणा

पंजाबच्या मुख्यमंत्र्यांना मालकाचे आदेश घेण्यासाठी तिहार जेलमध्ये जावे लागते

जालंधर(वृत्तसंस्था): ज्यांनी एवढा मोठा दारू घोटाळा केला आहे, ते पंजाबमधील ड्रग्जच्या काळ्या पैशात कसे बुडवणार नाहीत. झाडू पार्टी ड्रग्सची होलसेलर असून, पंजाबच्या मुख्यमंत्र्यांना मालकाचे आदेश घेण्यासाठी तिहार जेलमध्ये जावे लागते, असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आम आदमी पार्टीवर जोरदार निशाणा साधला. “पंजाबमध्ये ड्रग्ज माफिया आणि शूटर्स गँग यांचं राज्य सुरु आहे.

मुख्यमंत्री भगवंत मान हे फक्त कागदोपत्री मुख्यमंत्री आहेत. बाकी त्यांना पंजाबच्या परिस्थितीशी काही घेणंदेणं नाही. सगळे मंत्री मजा-मस्ती करत आहेत. अशा परिस्थितीत पंजाबचा विकास कसा होईल? सध्याचं पंजाबमधलं भगवंत मान सरकार हे भ्रष्ट सरकार आहे. “, असा आरोप त्यांनी केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी सलग दुसऱ्या दिवशी पंजाब दौऱ्यावर राहिले. सर्वप्रथम त्यांनी गुरुदासपूरमध्ये सभा घेतली. यानंतर त्यांनी जालंधरमध्ये एका सभेला संबोधित केले. पंजाबमध्ये इंडिया आघाडीचे लोक एकमेकांना शिव्या देतात. त्यामुळे यापैकी एकालाही मतदान करणे म्हणजे पंजाबच्या विरोधात मतदान करणे होय.

पंजाब आमचा विश्वास, पंजाबची प्रगती ही मोदींची हमी. पंजाबमध्ये उद्योगाला चालना मिळावी, पंजाबमधील लोकांना घरपोच काम मिळावे, असा आमचा संकल्प आहे. त्यामुळे आम्ही विकासाचे काम करत आहोत. आज जालंधरलाही वंदे भारत ट्रेन मिळाली आहे. जालंधर आणि फिल्लौर रेल्वे स्थानके विकसित होत आहेत, असे पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले.

“मी जर १९७१ मध्ये भारत-पाकिस्तान युद्ध झाले. त्यावेळी मी जर पंतप्रधान असतो तर आत्मसमर्पण करणाऱ्या ९० हजार पाकिस्तानी सैनिकांना सोडवले असते. तसेच पाकिस्तानकडून कर्तारपूर साहेब परत घेतले असते.” असे नरेंद्र मोदी यांनी दावा केला.पंतप्रधान नरेंद्र मोदींनी करतारपूर साहेब गुरुद्वाऱ्याचा भावनात्मक मुद्दा उपस्थित केला. देशाच्या फाळणीसाठी काँग्रेस जबाबदार आहे असेही ते म्हणाले. देशाची फाळणी झाली तेव्हा करतारपूर साहेब पाकिस्तानमध्ये जो पंजाब प्रांत गेला त्यात गेला. करतारपूर साहेब गुरुद्वारा भारताच्या सीमेपासून काही किलोमीटर अंतरावर आहे, असे ते यावेळी म्हणाले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -