Tuesday, June 18, 2024
Homeताज्या घडामोडीPost Office Scheme: पोस्ट ऑफिसच्या या स्पेशल स्कीममध्ये करा गुंतवणूक, दोन वर्षात...

Post Office Scheme: पोस्ट ऑफिसच्या या स्पेशल स्कीममध्ये करा गुंतवणूक, दोन वर्षात मिळेल इतका फायदा

मुंबई: केंद्र सरकार महिलांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी अनेक प्रकारच्या योजना राबवत असते. अशातच एक स्कीम आहे महिला सन्मान सेव्हिंग सर्टिफिकेट स्कीम. या स्कीमची सुरूवात २०२३मध्ये करण्यात आली होती. या स्कीमला खासकरून महिलांसाठीच्या गरजा ध्यानात घेऊन सुरूवात करण्यात आली.

जाणून घ्या स्कीमबद्दल

महिलांना आर्थिक रुपाने सक्षम बनवण्यासाठी सरकारने महिला सन्मान सेव्हिंग सर्टिफिकेट योजनेची सुरूवात केली. या योजनेंतगर्त महिलांना १००० रूपयांपासून ते २ लाख रूपयांपर्यंत गुंतवणूक करता येते. या योजनेंतर्गत महिला सन्मान सेव्हिंग सर्टिफिकेट अकाऊंट खोलू शकतात. मात्र एका खात्यातून दुसरे खाते खोलण्यामध्ये कमीत कमीत कमी ३ महिन्यांचे अंतर असणे आवश्यक आहे.

जमा राशीवर तगडे व्याज

या योजनेंतर्गत जमा झालेल्या राशीवर गुंतवणुकीवर ७.५० टक्के व्याजदर मिळत आहे. या स्कीममध्ये तुम्ही एकूण २ वर्षांपर्यंत गुंतवणूक करू शकता. अशातच तुम्ही जर मे २०२४मध्ये खाते सुरू केले तर मे २०२६ पर्यंत स्कीम मॅच्युअर होईल. खाते सुरू केल्यानंतर खातेधारक एका वर्षांनी ४० टक्क्यांपर्यंत रक्कम काढू शकतो.

कसे सुरू करा खाते

महिला सन्मान सेव्हिंग सर्टिफिकेट खाते तुम्ही कोणत्याही पोस्ट ऑफिस अथवा बँकमध्ये खोलू शकता. यासाठी तुम्हाला एक फॉर्म भरावा लागेल.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -