Wednesday, June 26, 2024
Homeक्राईमPune car accident : पुणे अपघातातल्या मुलाला वाचवण्यासाठी ससून रुग्णालयात ब्लड सॅम्पलची...

Pune car accident : पुणे अपघातातल्या मुलाला वाचवण्यासाठी ससून रुग्णालयात ब्लड सॅम्पलची अदलाबदल!

क्राईम ब्रँचकडून ससूनमधील डॉक्टरांना अटक

पुणे : पुणे येथे कल्याणीनगर भागात एका अल्पवयीन मुलाने मद्यधुंद अवस्थेत कार चालवत दोघांना चिरडले (Pune car accident). या प्रकरणात आता अनेक नवनवीन खुलासे होत आहेत. यातील आरोपी मुलगा वेदांत अग्रवाल हा पुण्यातील बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल (Vishal Agarwal) यांचा मुलगा आहे. त्याला वाचवण्यासाठी सध्या अख्खी यंत्रणाच कामाला लागली असल्याचे चित्र आहे. सुरुवातीला त्यांच्या ड्रायव्हरवर मुलगा नव्हे तर तो गाडी चालवत होता, असा जबाब देण्यासाठी दबाव टाकण्यात आला. यानंतर आता ससून रुग्णालयात (Sasoon Hospital) मुलाच्या ब्लड सॅम्पलची (Blood sample) थेट अदलाबदल झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. या प्रकरणी ससूनमधील दोन डॉक्टरांना अटक करण्यात आली आहे.

धनिकपुत्र कायद्याच्या तावडीतून सहीसलामत सुटावा, यासाठी ससूनमधील वरिष्ठ डॉक्टरांनी गैरकृत्य केल्याचा प्रकार समोर आला आहे. डॉ. अजय तावरे आणि डॉ. श्रीहरी हरलोर या दोघांनी मुख्य आरोपी असलेल्या अल्पवयीन मुलाच्या ब्लड सॅम्पलची अदलाबदल केल्याचे उघड झाले आहे. अल्पवयीन मुलाने मद्यप्राशन केले होते की नाही, हे तपासण्यासाठी तब्बल नऊ तासांच्या दिरंगाईनंतर पोलिसांनी ससून रुग्णालयात त्याची ब्लड टेस्ट केली होती. मात्र, या चाचणीतही मुलगा दोषी आढळू नये, यासाठी ससून रुग्णालयातील वरिष्ठ डॉक्टरांनीच त्याच्या रक्ताच्या नमुन्याची अदलाबदल केल्याचा प्रकार समोर आला आहे.

पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने याप्रकरणी दोन्ही डॉक्टरांना ताब्यात घेतले आहे. सध्या पुणे पोलीस आयुक्तलयात डॉ. अजय तावरे आणि डॉ. श्रीहरी हरलोर यांची कसून चौकशी सुरु आहे. या दोघांना दुपारी शिवाजीनगर न्यायालयात हजर केले जाईल. मात्र, या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे. एका धनाढ्य व्यक्तीच्या मुलाला गुन्ह्यातून वाचवण्यासाठी संपूर्ण यंत्रणाच कशी नियम धाब्यावर बसवून काम करु शकते, हे या घटनेमुळे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.

पोलिसांना आधीच संशय आल्याने दुसऱ्यांदा ब्लड टेस्ट?

येरवडा पोलिसांनी अपघात झाल्यानंतर या धनिकपुत्राच्या रक्तात मद्याचा किती अंश आहे, हे तपासण्यासाठी तातडीने त्याची ब्लड टेस्ट करणे अपेक्षित होते. मात्र, अपघात झाल्यानंतर तब्बल नऊ तासांनी त्याला ससून रुग्णालयात ब्लड टेस्ट करण्यासाठी नेण्यात आले. तोपर्यंत याप्रकरणाचा बराच बभ्रा झाला होता. याप्रकरणात धनिकपुत्राला मदत झाल्याच्या संशयाने पोलिसांनी पुन्हा त्याच दिवशी संध्याकाळी एका खासगी रुग्णालयात आरोपीच्या रक्ताची चाचणी केली. हे दोन्ही नमुने फॉरेन्सनिक लॅबकडे पाठवण्यात आले. तसेच ससून आणि खासगी रुग्णालयातील ब्लड सॅम्पल्स एकाच व्यक्तीचे आहेत की नाही, याचीही तपासणी करावी, असे पुणे पोलिसांकडून सांगण्यात आले होते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -