Friday, May 10, 2024
Homeक्रीडाभारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसऱ्या कसोटीवर पावसाचे सावट

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसऱ्या कसोटीवर पावसाचे सावट

जोहान्सबर्ग : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील ३ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना जोहान्सबर्ग येथे खेळवला जाणार आहे. आजपासून हा सामना खेळवला जाणार आहे. मात्र पहिल्या दिवसाच्या खेळात पाऊस खलनायक ठरण्याची शक्यता आहे.

वाँडरर्स स्टेडियम भारतासाठी ‘लकी’

या कसोटी सामन्यात यजमान दक्षिण आफ्रिकेची स्थिती करा किंवा मरा अशी असणार आहे. तर दुसऱ्या बाजूला टीम इंडियाकडे इतिहास रचण्याची संधी आहे. दक्षिण आफ्रिकेचा संघ जोहान्सबर्ग कसोटी जिंकू शकला नाही, येथे त्यांचा पराभव झाला तर त्यांना मालिका देखील गमवावी लागेल. असे झाल्यास भारताविरुद्ध घरच्या मैदानावर हा त्यांचा पहिला कसोटी मालिका पराभव ठरेल. दुसरीकडे, द. आफ्रिकेने हा सामना जिंकल्यास जोहान्सबर्गमध्ये भारताने कसोटी सामन्यात पराभूत होण्याची ही पहिलीच वेळ असेल.

भारतीय संघ हा सामना जिंकण्याच्या इराद्याने मैदानात उतरणार आहे, तर दक्षिण आफ्रिकेचा संघ टीम इंडियाला असे करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करेल, जेणेकरून द. आफ्रिकन संघ आपल्या मालिकेतील आशा कायम ठेवू शकेल. आता उद्दिष्ट मोठे असताना कसोटी सामन्यातील पहिल्या दिवसाचा खेळ महत्त्वाचा ठरतो. पण, हे उद्दिष्ट पूर्ण होण्याआधी जोहान्सबर्गमधून येणाऱ्या बातम्या चांगल्या नाहीत. पहिल्या दिवसाच्या खेळात पाऊस खलनायक ठरण्याची शक्यता आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -