Friday, May 10, 2024
Homeक्रीडाWorld Cup 2023 : पुण्यात काळे कपडे घालून वर्ल्डकप बघायला आलेल्या प्रेक्षकांना...

World Cup 2023 : पुण्यात काळे कपडे घालून वर्ल्डकप बघायला आलेल्या प्रेक्षकांना पोलिसांनी अडवलं

पोलिसांनी घेतला मराठा आंदोलकांचा धसका; पूर्वकल्पना न दिल्याने क्रीडा प्रेमींचा हिरमोड

पुणे : एकीकडे क्रिकेट वर्ल्डकप (Cricket Worldcup) सामने सुरु असल्याने जगभरातून चाहते भारतात येत आहेत तर दुसरीकडे मराठा आंदोलन (Maratha andolan) चिघळल्याने त्याचे पडसाद राज्यभरात उमटत आहेत. याचीच झळ आता वर्ल्डकपलाही पोहोचल्याचे दिसून येत आहे. आज पुण्यातील स्टेडिअममध्ये श्रीलंका विरुद्ध अफगाणिस्तान (Shrilanka VS Afganistan) वर्ल्डकप सामना आहे. त्यासाठी अनेक प्रेक्षक काळे कपडे परिधान करुन आले होते. मात्र, मराठा आंदोलनाचं कारण देत या प्रेक्षकांना पोलिसांनी स्टेडिअममध्ये जाण्यापासून अडवलं. त्यामुळे प्रेक्षकांचा हिरमोड झाला.

राज्यात मराठा आंदोलन प्रचंड चिघळलं असून अनेक ठिकाणी जाळपोळ, तोडफोड करण्यात आली. यामुळेच सगळीकडेच खळबळ उडाली आहे. याचाच परिणाम म्हणून आज पुण्यात काळे कपडे घालून वर्ल्डकप सामना पाहायला आलेल्यांची पोलिसांकडून अडवणूक करण्यात आली. मराठा आरक्षणासाठी राज्यभर सुरू असलेल्या आंदोलनाचे पडसाद वर्ल्डकप सामन्यात उमटू नयेत, कोणी काळे कपडे दाखवून याचा निषेध करू नये, म्हणून पोलीस यंत्रणांनी ही खबरदारी घेतलेली आहे.

वर्ल्डकपमध्ये कोणतीही बाधा निर्माण होऊ नये, यासाठी काळे कपडे घालण्यास मज्जाव करण्यात येत असल्याचं पोलिसांनी प्रेक्षकांना सांगितलं आहे. मात्र, यंत्रणांनी पूर्वकल्पना न दिल्याने जगाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या क्रीडा प्रेमींचा हिरमोड झाला आहे. पुण्यात यानंतर आणखी तीन सामने होणार आहेत. मराठा आरक्षणाचा तोडगा निघाला नाही. तर त्यावेळीही प्रेक्षकांना याच परिस्थितीला सामोरे जावे लागणार आहे. दरम्यान, पोलिसांनी सांगितलेल्या नियमांचं आम्ही पालन करु मात्र त्यांनीदेखील आम्हाला सहकार्य केलं पाहिजे, असं प्रेक्षकांनी म्हटलं आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -