Monday, May 20, 2024
Homeताज्या घडामोडीकांदा उत्पादक शेतकऱ्यावर केद्रांचा पुन्हा अन्याय

कांदा उत्पादक शेतकऱ्यावर केद्रांचा पुन्हा अन्याय

निर्यात मुल्य प्रती टन ८०० अमेरिकन डॉलर

नाना आहिरे / नांदगाव : केंद्र सरकारने पुन्हा एकदा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांवर अन्याय केला असून कांदा निर्यातीचा दर ८०० अमेरिकन डॉलर केला असून यामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यावर ऐन सदासुदीच्या काळात अन्याय झाल्याने या निर्णयाचा महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटनेने जाहीर निषेध केला.

राजस्थान, मध्यप्रदेश सह पाच राज्यांच्या निवडणुका सुरू असताना त्यात देशांतर्गत कांद्याच्या मागणीच्या तुलनेत पुरवठा घटल्याने आशिया खंडातील कांद्याची अग्रेसर बाजारपेठा म्हणून ओळख असलेल्या नाशिक जिल्हासह सर्वच बाजार समित्यांमध्ये कांद्याच्या दरामध्ये गत सप्ताहात वाढ होत घाऊक बाजारात कांदा सहा हजार रुपये प्रति क्विंटलच्या वर जाताच केंद्र सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाने देशांतर्गत कांद्याचे बाजार भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी कांद्याच्या निर्यात मूल्य डॉलर मध्ये वाढ करत प्रति मेट्रिक टन ८०० डॉलर ३१ डिसेंबर पर्यंत केल्याने या अघोषित निर्यात बंदीमुळे ऐन सणासुदीच्या काळामध्ये कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणी सापडणार आहे.

देशांतर्गत कांद्याचा तुटवडा निर्माण झाल्याने गेल्या बारा दिवसांमध्ये नाशिक जिल्हातील कृषी उत्पन्न बाजार समित्या मध्ये कांद्याच्या दर दुप्पट झाल्याने व ऑक्टोबर च्या दुसऱ्या सप्ताहात २२०० ते २५०० रुपये मिळणारे बाजार भाव शेवटच्या सप्ताहात ५५०० ते ६००० रुपयांपर्यंत गेल्याने केंद्र सरकार खडबडून जागे होत नाफेड एनसीसीएफ च्या माध्यमातून खरेदी केलेल्या कांद्याच्या बफर स्टॉक मधून दोन लाख मॅट्रिक टन कांदा २५रुपये किलो दराने बाजारात विक्री करण्याच्या निर्णयाला २४ तास उलटत नाही तोच केंद्र सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाने अधिसूचना काढत कांद्याच्या निर्यात शुल्क दरामध्ये वाढ करण्याचा निर्णय घेत ४०० डॉलर वरून ८०० डॉलर केल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये या निर्णयाविरुद्ध संतापाची लाट उसळली आहे.

आज नाशिक जिल्हातील सर्व बाजार समितीत मागील सप्ताहा पेक्षा आवक जास्त झाल्याने बाजारभाव ५०० ते ६०० रूपयांनी कमी झाले.

या अगोदर केंद्र सरकारने कांद्याचे बाजार भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी कांदा निर्यात शुल्क वाढ करत ४० टक्के केले बाजार समित्या बंद ठेवून कांदा उत्पादक शेतकरी आणि व्यापाऱ्यांनी या निर्णयाचा निषेध केला होता आता कांदा निर्यात मूल्य दरामध्ये ८०० डॉलर प्रति मॅट्रिक टन केल्याने कांदा उत्पादक शेतकरी या निर्णयाविरुद्ध काय भूमिका घेतात याकडे आता लक्ष लागेल आहे.

“येत्या दहा बारा दिवसांवर दिवाळी येऊन ठेपल्याने शेतकऱ्यांनी बाजारात गर्दी केली आहे.शेतकऱ्यांना सणानिमित्त माल विकण्याची घाई आहे.तरी तालुक्यातील शेतकऱ्यांनी टप्याटप्याने माल बजारात विक्रीसाठी आणावा, सरकारने निर्यात मूल्य डॉलर मध्ये वाढ करत प्रति मेट्रिक टन ८०० डॉलर केल्याने चार ते पाच रुपयाची घसरण झाली आहे.” – भूषण धूत, व्यापारी, नांदगाव

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -