Thursday, May 9, 2024
Homeताज्या घडामोडीआम्हाला धमकावण्याचा लायसन्स कोणाला नाही, चीन दौऱ्यानंतर पाहा काय म्हणाले मालदीवचे राष्ट्रपती

आम्हाला धमकावण्याचा लायसन्स कोणाला नाही, चीन दौऱ्यानंतर पाहा काय म्हणाले मालदीवचे राष्ट्रपती

नवी दिल्ली: मालदीवचे(maldives) राष्ट्रपती मोहम्मद मुईज्जू चीनच्या पाच दिवसांच्या दौऱ्यानंतर परतले आहे. ते मालदीवला परतताच त्यांची भाषाच बदलली आहे. दौऱ्यावरून परतताच ते म्हणाले की आम्हाला धमकावण्याचा लायसन्स कोणालाही नाही.

मुईज्जू म्हणाले, पाच दिवसांच्या चीनच्या दौऱ्यानतंर राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्याशी भेट घेतली होती. त्यांचा हा दौरा यावेळेस होता जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींविरुद्ध अपमानजनक विधान केल्याप्रकरणी मालदीव सरकारच्या तीन मंत्र्यांना निलंबित केले होते. यावरून भारत आणि मालदीव दोन्ही देशांमध्ये राजकीय वाद वाढला आहे.

मुईज्जू यांची भाषा बदलली

भारतात सुरू असलेल्या बॉयकॉट मालदीव या ट्रेंडदरम्यान मुईज्जू यांनी चीनला अपील केले होते की त्यांनी अधिकाधिक चीनी पर्यटक मालदीवला पाठवावेत. मालदीव बिझनेस फोरमला संबोधित करताना मुईज्जू म्हणाले होते की कोरोनाआधी आमच्या देशात सर्वाधिक पर्यटक चीनमधून येत होते.

चीनचा दौरा वादात का होता?

मुइज्जू यांचा चीनचा हा पहिला राजकीय दौरा होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी याच्या लक्षद्वीप दौऱ्यावरून झालेल्या वादावरून मालदीवच्या तीन मंत्र्यानी सोशल मीडियावर अपमानजनक विधान केले होते. यानंतर सोशल मीडियावर हे प्रकरण तापले होते. या प्रकरणी मालदीवच्या तीन मंत्र्यांना सरकारकडून निलंबित करण्यात आले होते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -